दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी सुधारीत तारखा जाहीर
नांदेड दि. 25 :- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे
यांचेमार्फत मार्च 2017 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता
10 वी परीक्षेस नियमित प्रविष्ठ होणारे विद्यार्थी पूनर्परीक्षार्थी, नावनोंदणी
प्रमाणपत्र प्राप्त झालेले पुर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत
प्रविष्ठ होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांचे
अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर सादर करण्यासाठी सुधारीत तारखा पुढील प्रमाणे आहेत.
नियमित शुल्कासह माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची मुदत सोमवार 28
नोव्हेंबर 2016 तर विलंब शुल्कासह मंगळवार 29 नोव्हेंबर 2016 ते सोमवार 5 डिसेंबर
2016 या कालावधीत.
मंगळवार 29 नोव्हेंबर 2016 ते बुधवार
7 डिसेंबर 2016 या कालावधीत शाळांनी परीक्षा शुल्काचे चलन व विद्यार्थ्यांच्या
याद्या एक्सलमध्ये प्रिंटींग करावी. परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात
येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क साधावा.
ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळाशी
संपर्क साधावा. शासन निर्णयानुसार ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचे जन्म ठिकाण
नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करण्यात यावी. इयत्ता 10
वीचे अर्ज भरताना आधार कार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी
एखाद्या विद्यार्थ्याकडे आधार कार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक देखील
ग्राह्य धरण्यात येईल. नोंदणी देखील केलेली नसेल तर निकालापर्यंत आधार कार्ड
काढण्यात येईल, असे विद्यार्थ्यांने प्राचार्य, मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र
देणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून अर्ज भरले नाही असे
होणार नाही. तसेच माध्यमिक शाळांची बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा
स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे आवाहन राज्य मंडळाच्यावतीने लातूर विभागीय शिक्षण
मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment