अनुसूचित जातीतील चर्मकार समाजात
कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या
व्यक्तीच्या वारसदारासाठी कर्ज योजना
नांदेड
(जिमाका) दि. 2 :- राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त
आणि विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्यावतीने अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी
स्माईल (Smile) ही नवीन योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. कोविड-19 या प्रादुर्भावामुळे
ज्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशा कुटुंबातील प्रमुख वारसदाराला
एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्याकडून 5 लाख रुपयापर्यंत व्यवसायासाठी कर्ज देण्याची ही
योजना विचाराधीन आहे.
यात एनएसएफडीसी कर्ज 4 लाख रुपयासाठी व्याजदार 6 टक्के तर भांडवली
अनुदान हे 1 लाख रुपये राहिल. यासाठी मृत्यू व्यक्तीचे नाव, संपूर्ण पत्ता, आधार
क्रमांक, जन्म दिनांक, लिंग, जात / पोटजात, मृत्यूचा दिनांक, रेशनकार्ड, मयत
झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, कुटुंबातील व्यक्तीची एकुण संख्या, कुटुंबातील
प्रमुख वारसदार व वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयाच्या आत असावे. कोविड-19 च्या
प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने ही माहिती संत रोहिदास
चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन कामठा रोड नांदेड येथे सादर करावी किंवा महामंडळाच्या ई-मेलवर
पाठवावी. अधिक माहितीसाठी https://forms.gle/Q485fSUQYEuL4xUx7 या लिंकवर संपर्क
साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment