Saturday, October 31, 2020

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात  

ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 नोव्हेंबरपर्यंत वाढ 

नांदेड (जिमाका) दि. 31 :-  कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी सोमवार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केला आहे. 

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 1 व 14 ऑक्टोंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सोमवार 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. 

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे, नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 ऑक्टोंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

0000

Friday, October 30, 2020

 

 105 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

43 कोरोना बाधितांची भर तर तिघांचा मृत्यू     

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 105 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 43 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 18 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 25 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 299 अहवालापैकी  1 हजार 226 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 70 एवढी झाली असून यातील  17  हजार 822 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 600 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 41 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात तीन बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. यात शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी बाफना रोड नांदेड येथील 61 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात, वजिराबाद नांदेड येथील 59 वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे, तर बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील 38 वर्षाच्या एका पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 507 एवढीच आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये लोहा कोविड केअर सेंटर येथे 3, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 2, कंधार कोविड केअर सेंटर येथे 6, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 6, किनवट कोविड केअर सेंटर येथे 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 60, खाजगी रुग्णालय 25  असे  105 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.74 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 11, बिलोली तालुक्यात 1, कंधार 3, भोकर 1, देगलूर 2 असे एकुण 18 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 9, अर्धापूर तालुक्यात 1, धर्माबाद 1, किनवट 3, नायगाव 1, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 5, हिमायतनगर 1, मुदखेड 1, उमरी 1 असे एकूण 25 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 600 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 155, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 33, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 150, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 19, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 28, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 7, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 9, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 18, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 13, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 10, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 2, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, उमरी तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 70, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

शुक्रवार 30 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 74, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 67 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 13 हजार 94

निगेटिव्ह स्वॅब- 90 हजार 339

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 70

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 822

एकूण मृत्यू संख्या- 507

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 391

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 600

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 41.

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

Thursday, October 29, 2020

 

101 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 71 कोरोना बाधितांची भर      

नांदेड (जिमाका) दि. 29 :- गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 101 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 71 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 27 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 44 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 591 अहवालापैकी  1 हजार 505 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 27 एवढी झाली असून यातील  17  हजार 717 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 669 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 2, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 1, बिलोली कोविड केंअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, हदगाव कोविड केंअर सेंटर 1, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 70, किनवट कोविड केंअर सेंटर 3, खाजगी रुग्णालय 13 असे  101 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 22, बिलोली तालुक्यात 1, मुखेड 2, मुदखेड 1, नायगाव 1 असे एकुण 27 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 13, लोहा तालुक्यात 3, अर्धापूर 6, नायगाव 1, मुखेड 2, नांदेड ग्रामीण 3, हदगाव 3, बिलोली 8, धर्माबाद 4, मुदखेड 1 असे एकूण 44 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 669 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 157, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 192, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 44, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 24, हदगाव कोविड केअर सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 16, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 19,  मांडवी कोविड केअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड केअर सेंटर येथे 30, धर्माबाद कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 8, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, भोकर कोविड केअर सेंटर 6,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 90, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 72, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 68 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 11 हजार 440

निगेटिव्ह स्वॅब- 88 हजार 959

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 27

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 717

एकूण मृत्यू संख्या- 504

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-01

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 487 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 669

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

ऑनलाईन महारोजगार मेळावा

1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत आयोजन 

 नांदेड (जिमाका) दि. 29 :- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, औरंगाबाद यांच्यामार्फत  1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर 2020 या कालावधीत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. एस.एस.सी., एच.एस.सी., आय.टी.आय., पदवीधर, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर, एम.बी.ए, इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे. 

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन आप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रिज लि औरंगाबाद,चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, सेंसीव्ह एज्युकेशन लि.पुणे श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकिंत उद्योजकांनी 1902 ऑनलाईन  रिक्तपदे अधिसुचित केलेली  आहेत. 

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क करावा. तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे.

00000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...