Sunday, July 19, 2020

वृत्त क्र. 664


नांदेड जिल्ह्यात आज 66 बाधितांची भर
कोरोनातून आज 24 व्यक्ती बरे तर दोघांचा मृत्यू 
नांदेड (जिमाका) दि. 19 :-  जिल्ह्यात आज 19  जुलै रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार आज 66 व्यक्ती बाधित झाले. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47 तर अँटीजेन टेस्ट किट तपासणीद्वारे 19 बाधित आहेत. जिल्ह्यातील आज 24 व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. देशमुख कॉलनी नांदेड येथील 65 वर्षाची महिला व परभणी जिल्ह्यातील मानवत येथील 64 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सदर बाधितास अनुक्रमे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या बाधितास उच्च रक्तदाब, मधुमेह व श्वसनाचे आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या 46 एवढी झाली आहे. यात 39 मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत 7 मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण 478 अहवालापैकी 402 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 935 एवढी झाली आहे. यातील 500 एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना  सुट्टी देण्यात आली आहे.  आज रोजी 389 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 31 बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात 17 महिला व 14 पुरुषांचा समावेश आहे.
आज बरे झालेल्या 24 बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 6, डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 3, जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील 2, पंजाब कोविड केअर सेंटर येथील 13 बाधितांचा यात समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे 47 बाधितांपैकी एसजीजीएस एअरपोर्ट नांदेड येथील  1 व्यक्ती, श्रीनगर नांदेड येथील 2, सराफा चौक नांदेड येथील 1, पिरबुऱ्हानगर येथील 1, सोमेश कॉलनी नांदेड येथील 11, विष्णुनगर नांदेड येथील 1, शहिदपुरा येथील 2, जुनामोंढा नांदेड येथील 2, खालसा कॉलनी नांदेड येथील 1, पाठक गल्ली सराफा नांदेड येथील 2, देगलूरनाका नांदेड येथील 1, मालवतकर कॉलनी जुना कौठा नांदेड येथील 1, मिलगेट नांदेड येथील 1, विसावानगर नांदेड येथील 1, विष्णु कॉम्पलेक्स व्हिआयपी रोड नांदेड येथील 1, शहिदपुरा येथील 3, बळीराम ता. नांदेड येथील 2, गाडीपुरा येथील 1, गोविंदनगर नांदेड येथील 1, विष्णुपूरी नांदेड 1, गाडीपुरा नांदेड येथील 2, विष्णुपुरी जि.एम.सी. परिसर येथील 1, बिलोली तालुक्यातील कोल्हेबोर गाव येथील 1, मुखेड तालुक्यातील खैरका येथील 2, रावी ता. मुखेड येथील 1, मानसपुरी कंधार येथील 1, फुलवळ कंधार येथील 8, हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील 2, हिंगोली श्रीनगर येथील 1, आंबेडकरनगर नांदेड येथील 1, विष्णुनगर नांदेड येथील 3, गाडीपुरा नांदेड येथील 1, साईनगर इतवारा नांदेड येथील 2, पांडुरंगनगर येथील 1, परभणी जिल्ह्यातील श्रीकृष्ण गंगाखेड येथील 2 व्यक्ती बाधित आढळले आहेत. असे एकुण नवीन बाधित हे 66 आहेत.
जिल्ह्यात 389 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 77, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 144, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 12, जिल्हा रुग्णालय येथे 24, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 12, मुदखेड कोविड केअर सेंटर येथे 5, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 27, हदगाव कोविड केअर सेंटर येथे 1, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 17, माहूर कोविड केअर सेंटर 1, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे 3, लोहा कोविड केअर सेंटर येथे 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 42 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 7 बाधित औरंगाबाद येथे तर निजामाबाद येथे 1 बाधित संदर्भित झाले आहेत. 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
घेतलेले स्वॅब- 10 हजार 102,
निगेटिव्ह स्वॅब- 8 हजार 275,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 66
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 935,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 5,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 46,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 500,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 389,
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 208.  
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   
00000


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...