मंत्री राजकुमार बडोले
साधणार जनतेशी ई-संवाद
नांदेड, दि. 13 : महाराष्ट्र
राज्याच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले, हे राज्यातील जनतेशी गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत. ऐरोली, नवी मुंबई येथील, पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून श्री. बडोले ई-संवाद साधणार
आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
विभागाकडून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,दिव्यांग, आणि निराश्रीत इत्यादी समाजघटकांसाठी कल्याणकारी योजनांच्या
अंमलबजावणी बरोबरच सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत.
ई-संवादद्वारे जनतेच्या विविध प्रश्नांची उत्तरे श्री. बडोले देणार आहेत.
या कार्यक्रमात elearning.parthinfotech.in लिंक द्वारे
सहभागी होऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, त्यांची यशस्विता, याबाबतचे प्रश्न, 83 84 85 86 85 या क्रमांकावर
व्हॉटसअॅप द्वारे श्री. बडोले यांना विचारावेत, असे आवाहन सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात येत आहे.
0000000
No comments:
Post a Comment