किमान आधारभूत खरेदी
योजनेंतर्गत
कापूस खरेदीच्या शुभारंभ
संपन्न
नांदेड दि. 24 :- राज्य सहकारी कापूस
उत्पादक पणन महासंघ नांदेड विभागीय कार्यालयामार्फत केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी
योजनेंतर्गत कापूस हंगाम 2018-19 मधील कापूस खरेदीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ
खा. अशोकराव चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली भोकर तालुक्यातील मे. व्यंकटेश कॉटन प्रा. लि. पोमनाळा या कापूस खरेदी केंद्रावर आ.
अमिता चव्हाण यांचे हस्ते आज संपन्न झाला.
यावेळी भोकर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती जगदिश पाटील भोसीकर, कापूस
पणन महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे, गोविंदराव शिंदे, भोकर तालुका खरेदी विक्री
संघाचे चेअरमन मारोतराव बल्लाळकर, सहायक निबंधक सहकारी संस्था, सचिव कृषी उत्पन्न
बाजार समिती भोकर मे. व्यंकटेश कॉटन, प्रा. लि. पोमनाळाचे देवानंदजी धुत, विभागीय
व्यवस्थापक अे. व्ही. मुळे, विभागीय उपव्यवस्थापक एस. जी. हनवते, जे. अे.
सुर्यवंशी, सि. ग्रेडर, व्ही. एन. माने आदींची उपस्थिती होती.
0000
No comments:
Post a Comment