Friday, September 29, 2017

महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री
यांची जयंतीबाबत आवाहन
           नांदेड, दि. 29 :- महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोंबर 2017 रोजी सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान व त्याअंतर्गत सोमवार 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.45 वा. सर्व शासकीय कार्यालयात महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालयांना करण्यात आले आहे.
            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन  आंतरराष्ट्रीय  अहिंसा दिन  म्हणून जगभर पाळण्यात येतो. त्यानिमित्त 2 ऑक्टोंबर रोजी सर्वांनी महात्मा गांधीच्या अमर संदेशाप्रती कटिबद्ध राहण्याची शपथ घ्यावयाची आहे. त्या दिवशी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध समयोचित कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा मुख्यालयांसह सर्व ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नियोजन करण्यात यावे, त्यासाठी जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, अन्य मान्यवर, एनसीसी, एमएसस, छात्रसैनिक, शहरातील महाविद्यालयांचे प्राचार्य व शाळांचे मुख्याध्यापक तसेच विविध सामाजिक व स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी यांना निमंत्रित करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
 00000


आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा
- डॉ. बी. पी. कदम
नांदेड दि. 29 :-  जागतिक हृदय  दिन, आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरीक दिन पंधरवडा निमित्त जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात शुक्रवार 29 सप्टेंबर ते बुधवार 18 ऑक्टोंबर या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम यांनी केले आहे.  
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील  रुग्ण व नातेवाईक यांना हृदयरोगाबद्दल तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी उपस्थित रुग्णांना हृदयरोगाची विविध करणे सांगून हृदय रोगापासून दूर कसे राहता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलदीपक, डॉ. रहेमान, डॉ. एस. एस. राठोड, डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. माया कागणे, डॉ. सभा खान, डॉ. पी. डी. बोरसे, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

000000
हवामानावर आधारित पीक विमा
योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे
नांदेड दि. 29 :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहारासाठी लागु करण्यात आली आहे.. शासन निर्णय 28 सप्टेंबर 2017 नुसार पिक विमा भरण्याची अंतिम मुदत द्राक्ष पिकासाठी 15 ऑक्टोंबर 2017, केळी, मोसंबी पिकासाठी 31 ऑक्टोंबर 2017,  आंबा पिकासाठी 31 डिसेंबर 2017  पर्यंत आहे. जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
ही योजना अधिसुचित पिकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीची तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  ऐच्छिक असून बजाज अलायझ इन्शुरन्स कंपनी येरवाडा पुणे या कंपनीकडून योजना कार्यन्वयीत केली आहे.
विमा हप्ता दर
फळपिक
विमा संरक्षित रक्कम (नियमित)
गारपीट विमा संरक्षित रक्कम
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम
नियमित
गारपीट
द्राक्ष
280000
93300
14000
4665
मोसंबी
70000
23300
3500
1165
केळी
120000
40000
6000
2000
आंबा
110000
36700
5500
1835
योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे
            ही योजना नांदेड जिल्ह्यात पुढील प्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल.
अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड
प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामानावर आधारित फळपिक विमा आंबीया बहारामध्ये अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी व नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
00000


वाहन नोंदणीसाठी
आज आरटीओ कार्यालय सुरु 
नांदेड दि. 29 :- सार्वजनिक सुट्टी दसरा शनिवार 30 सप्टेंबर रोजी वाहन नोंदणीचे व त्याअनुषंगीक कर वसुली कामकाजासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड चालु राहणार आहे. या सुविधेचा लाभ घेऊन वाहन नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
शेतकरी कर्जमाफी ऑनलाईन
अर्जाचे चावडी वाचन सुरु
नांदेड दि. 29 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 329 गावामध्ये 2 लाख 66 हजार 133 कर्जमाफीसाठी ऑनलाईन दाखल अर्जाचे चावडी वाचन नांदेड जिल्ह्यातील निवडणूक आचार संहिता लागू असलेल्या ग्रामपंचायती वगळता प्रत्येक गांवामध्ये करण्यात येत आहे. थेट कर्जमाफीच्या लाभाशी निगडित याद्यांचे  वाचन होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया संख्यने हजेरी लावल्याचे दिसून येते.
कर्जमाफीसाठी जिल्हयातील 2 लाख 66 हजार 133 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. प्राप्त अर्जाचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडीट) करण्यासाठी गाव निहाय चावडी वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्या शेतकऱ्यांनी कुटुंबातील किती सदस्यांच्या नावावर कर्ज घेतले एकापेक्षा अधिक बँकामधून कर्ज घेतले, अर्ज भरलेला शेतकरी इन्कम टॅक्स भरणा करतो का ? कर्जमाफी अर्ज भरणारी व्यक्ती  शासकीय सेवेत आहे का ? एखाद्या व्यक्तीने भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जाबाबत गावातील कोणाला आक्षेप किंवा शंका आहे का ? याबाबतची माहिती चावडी वाचनातून मिळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
चावडी वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिवाय तिथे शेतकऱ्याचा नावासमोर शेरा लिहिण्याच्या सूचना तालुका समितीने चावडी वाचन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या चावडी वाचन कार्यक्रमास शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे यावेळी  कर्मचाऱ्यांनी निरसन केले. अन्य ग्रामपंचायतीमध्ये पुढील दोन दिवसात चावडीवाचन पूर्ण केले जाईल. कोणाचे आक्षेप असल्यास पुराव्यासह सबंधित तालुक्याचे सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचेकडे चावडी वाचनाच्या दिनांकापासून तीन दिवसात देण्यात यावेत, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था  प्रवीण फडणीस यांनी सांगितले.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...