महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने
रावळकर कुटुंबियांना 3 लाख रुपयांची आर्थीक मदत
जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते वितरीत
नांदेड, दि. 29 :- अवयवदानामुळे अजरामर झालेल्या सुधीर रावळकर
यांच्या पत्नी तिलोत्तमा रावळकर व मुलगी श्रृती यांना जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या
हस्ते 3 लाख रुपयांची आर्थीक मदत आज देण्यात आली. श्री. काकाणी यांनी त्यांची आस्थेवाईकपणे
चौकशी करुन सांत्वन केले. महसूल अधिकारी, कर्मचारी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगीतले.
रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी
जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकारी यांनी केलेल्या
आवाहनाला जिल्ह्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मोठा प्रतिसाद देवून रावळकर कुटुंबियांना आर्थिक मदत स्वत:
स्वयंस्फुर्तीने दिली आहे. यावेळी रावळकर कुटुंबियांच्या पाठीशी खंबिरपणे आम्ही
उभे आहोत असा विश्वास दिल्याने त्यांना एक मायेचा आधार मिळाला आहे.
000000
No comments:
Post a Comment