Sunday, July 31, 2022

 नांदेड जिल्ह्यात 12 व्यक्ती कोरोना बाधित

तर कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 141 अहवालापैकी 12 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 12 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 176 एवढी झाली असून यातील 1 लाख 409 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 76 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, अर्धापूर 1, बिलोली 1, देगलूर 2, हदगाव 1, कंधार 1, लोहा 1, उमरी 1 असे एकुण 12 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1 असे एकुण 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 59,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 15 असे एकुण 76 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

0000

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

पर्यावरणासाठी धर्मापुरीकर यांची अनोखी जागृती  

 

नांदेड (जिमाका) दि. 31 :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय, स्वायत्तता संस्था, सेवाभावी संस्था यांच्या समवेत अनेक जागरूक नागरिकही आपल्या अभिनव उपक्रमातून योगदान देत आहेत. यात व्यंगचित्राचे संग्राहक व अभ्यासक मधुकर धर्मापूरीकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. पर्यावरण विषयावर मोलाचा व मर्मभेदी संदेश देणाऱ्या जागतिक पातळीवरील व्यंगचित्रांचा संग्रह त्यांनी केला आहे. यातून निवडक व्यंगचित्रांना घेऊन सांभाळू या सृष्टीला या शिर्षकाखाली एक अभिनव प्रदर्शन त्यांनी नांदेडकरांच्या भेटीला दिले.

 

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व वृक्षमित्र फाउंडेशन यांच्यावतीने नांदेड शहरात पर्यावरण संतुलनाबाबत सुरू असलेल्या विविध उपक्रमांना धरुन आज पर्यावरण महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हे अभिनव प्रदर्शन डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह परिसरात आयोजित केले होते. याला नांदेडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.


एक नागरिक म्हणून प्रत्येकाच्या मनात देशाप्रती स्वाभीमान असतोच. या स्वाभिमानाला आपण ज्या भवतालात राहतो, त्या भवतालाला, पर्यावरणाला सावरून धरण्यासाठी आपल्याकडून प्रत्यक्ष कृतीचीही जोड आवश्यक असते. कोणत्याही माणसाला कृती पर्यंत पोहचविण्यासाठी खूप प्रोत्साहन द्यावे लागते. त्याच्या मनात जागृतीही करावी लागते. पर्यावरणाच्या बाबतीत जागतिक पातळीवर अतिशय सुंदर भाष्य करणारी अनेक व्यंगचित्र आहेत. त्याद्वारे पर्यावरणाच्या जागृतीचा एक विचार पोहचविण्याचा हा माझा प्रयत्न असल्याच्या भावना मधुकर धर्मापुरीकर यांनी बोलून दाखविल्या. हे प्रदर्शन हौसेपोटी जरी असले तरी ते स्वयंस्फूर्त व आपल्याकडून काही योगदान देता येईल का त्या विचारातून साकारल्याचेही त्यांनी सांगितले. एक दिवसीय असलेल्या या प्रदर्शनाला नांदेडकरांनी उत्स्फूर्त हजेरी दिली.

00000 








 



Friday, July 29, 2022

 नांदेड जिल्ह्यात 17 व्यक्ती कोरोना बाधित

तर 13 कोरोना बाधित झाले बरे 

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 180 अहवालापैकी 17 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 3 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 134 एवढी झाली असून यातील 1 लाख 398 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 44 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, माहूर 3, भोकर 1, नायगाव 1, धर्माबाद 1, वसमत 1, हदगाव 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे बिलोली येथील 3 असे एकुण 17 कोरोना बाधित आढळले आहे. 

 

आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 13 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 23,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 15 असे एकुण 44 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 12 हजार 619

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 92 हजार 105

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 3 हजार 134

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 398

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-44

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक. 

 000000

 महावितरण आपल्या दारी आले ही भाग्याची गोष्ट

आकोडे टाकून वीज वापरणे हे दुर्दैव - अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

 

विविध कार्यक्रमांनी रंगला ऊर्जा महोत्सव

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- मागील काही दशकातील विजेची स्थिती पाहता आज विद्युत क्षेत्रात मोठी क्रांती झाल्याचे मान्यच करावे लागेल. आपल्या जीवनात प्रकाश पोहोचवण्यासाठी महावितरण आपल्या दारी आले आहे ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे असे मनोगत अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे दिनांक 29 जुलै रोजी मोठ्या उत्साहात उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य पॉवर ॲट 2047 या संकल्पनेतून महावितरणच्या वतीने ऊर्जा महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवाचा अध्यक्षीय समारोप करताना श्री परदेशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी रॉकेलचा दिवा, स्टंगस्टनचा दिवा पाहिलेला आहे. विजे विना ग्रामस्थांचे जीवन काय असते याची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे. त्या दृष्टीने आजचा काळ हा एक ऊर्जा क्रांतीचा काळ आहे हे मान्य करावे लागेल. ग्राहकाभिमुखतेच्या दृष्टीने शासन हे विकासात्मक योजना राबवत असते त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवं. सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडवणारी योजना आहे. यामुळे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे शाश्वत सिंचन करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. कोरोनाच्या महामारी मध्ये माझा मुलगा अखंडित विजे मुळेच शिक्षण घेऊ शकला, असे सांगत श्री परदेशी म्हणाले की पूर्वजांच्या कर्तबगारीवरच आज आपण जगत आहोत. ही बाब दुर्लक्षित न करता येणारी आहे. वीज चोरून वापरणे, वापरलेल्या विजेचे बिल न भरणे या गोष्टी आपण टाळायला हव्यात. महावितरणचा लाईनमन उन्हा पावसात आपल्याला वीज पुरवण्यासाठी प्रयत्न करत असतो. वीज खंडीत झाल्याच्या  काळात लाईनमनला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमास नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर, केंद्र शासनाच्या पॉवर फायनान्स कार्पोरेशनचे समन्वयक श्री रविंद्र रेंगडे, महावितरणच्या नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव, महापारेषणचे अधीक्ष्क अभियंता श्री मिलींद बनसोडे, प्रभारी अधीक्षक अभियंता श्री सुनिल वनमोरे, त्याचबरोबर श्री सुशील पावसकर, तौसिफ पटेल, महापारेषणचे कार्यकारी अभियंता श्री माधव सोनकांबळे, श्री पवार, श्री कुलकर्णी, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री अभीमन्यू राख, श्री श्रीनिवास चटलावार प्रामुख्याने उपस्थित होते.

 

याप्रसंगी मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी राज्यात व परिमंडळात झालेल्या विद्युतीकरणावर प्रकाश टाकला. तसेच भविष्यात विजेच्या क्षेत्रात होणारा बदल स्पष्ट करत सौभाग्य योजने अंतर्गत नांदेड जिल्हयातील 28 हजार कुटूंबियांना प्रकाश पोहचवण्याचे काम करण्याची संधी प्राप्त झाली याचा आनंद आहे. आज रोजी नांदेड जिल्हयात 2100 कोटी रूपयांची थकबाकी आहे. त्यामुळे उदयासाठी वीज हवी असेल तर आज विकलेल्या प्रत्येक युनीटच्या बिलाची वसुली झाली पाहिजे असे स्पष्ट करत दरमहा वीजबील भरण्याचे आवाहन केले. या प्रसंगी महावितरणच्या विवीध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यी श्री संभाजी लूकूडवार, श्री गजानन हेंडगे, परमेश्वर शिंदे,श्री पांडूरंग चेलकेवार तसेच श्री चेलकेवाड यांनी  मनोगते व्यक्त करत आमच्या जीवनात प्रकाश निर्माण केला असे गौरवोउदगार काढत महावितरणला धन्यवाद दिले.

 

ऊर्जा विभागाच्या विविध कामांची चित्रफीत, प्रमोद देशमूख यांचे पथनाट्य, मोतीराम जोंधळे यांनी कलापथकाव्दारे ऊर्जा विषयक जनजागृती असा भरगच्च कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविक सादर करत अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव यांनी नांदेड जिल्हयात गेल्या आठ वर्षात झालेल्या कामांची माहिती दिली.कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन धनंजय पवार यांनी केले.कार्यक्रम यशश्वितेसाठी अभियंते श्री स्वप्नील जोशी, श्री नारायण मार्लेगावकर, श्री जनार्दन चौधरी, श्री प्रमोद क्षीरसागर, श्री गट्टूवार, श्री दंडगव्हाण व जनमित्रांनी परिश्रम घेतले. यावेळी नायगाव उपविभागातील लाभार्थी ग्रामस्थ तसेच महावितरणचे सर्व अभियंते, अधीकारी व जनमित्र मोठया संख्येने उपस्थित होते.




 

फोटो ओळ:- ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी. मुख्य अभियंता श्री पडळकर, अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व अधिकारी.

00000


 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी  6.90 मि.मी. पाऊस


नांदेड (जिमाका) दि.
 29 :- जिल्ह्यात शुक्रवार 29 जुलै रोजी सकाळी 8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 737.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात शुक्रवार 29 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणेकंसात एकूण पाऊस : नांदेड- 5 (694.50), बिलोली-1.80 (777.20), मुखेड- 8.70 (679.30), कंधार-0.20 (692.10), लोहा-0.20 (663), हदगाव-3.70 (654.60), भोकर-28(865.30), देगलूर-0.40 (628.60), किनवट-16.40 (817.40), मुदखेड- 7.80 (892.80), हिमायतनगर-14 (1024.60), माहूर- 2.20 (664.40), धर्माबाद- 8.10 (814.90), उमरी- 18.70(918.60), अर्धापूर- 4.40 (674.10), नायगाव-1 (666.90) मिलीमीटर आहे.

0000 

Thursday, July 28, 2022

 नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटाच्या आरक्षणाची सोडत जाहीर   

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण सोडत सुधारीत कार्यक्रमानुसार नांदेड जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सोडतीचे निकाल पुढील प्रमाणे आहे.

 

माहूर तालुक्यात लखमापूर अनुसूचित जमाती, वाई बा. अनुसूचित जाती, वानोळा सर्वसाधारण गटासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. किनवट तालुक्यातील सारखणी सर्वसाधारण, मांडवी सर्वसाधारण, मोहपूर अनुसूचित जाती (महिला), गोकुंदा अनुसूचित जाती (महिला), बोधडी बु. अनुसूचित जाती, जलधारा सर्वसाधारण, इस्लापूर अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरंजणी सर्वसाधारण महिला, सरसम बु. सर्वसाधारण महिला, दुधड अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. हदगाव तालुक्यातील निवघा बा. सर्वसाधारण महिला, रुई धा. सर्वसाधारण महिला, पळसा सर्वसाधारण, कोळी सर्वसाधारण महिला, मनाठा ना. मा. प्र. (महिला), तामसा सर्वसाधारण, आष्टी ना. मा. प्र. साठी आरक्षण जाहीर झाले आहे. अर्धापूर तालुक्यातील लहान अनुसूचित जमाती (महिला), येळेगाव सर्वसाधारण, मालेगाव ना.मा. प्र साठी आरक्षण जाहीर झाले आहे. नांदेड तालुक्यातील वाजेगाव ना.मा.प्र (महिला), वाडी बु. सर्वसाधारण, लिंबगाव सर्वसाधारण, धनेगाव ना.मा.प्र. (महिला), बळीरामपूर सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुदखेड तालुक्यातील बारड सर्वसाधारण, मुगट सर्वसाधारण, माळकौठा सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. भोकर तालुक्यात पाळज सर्वसाधारण (महिला), भोसी अनुसूचित जाती (महिला), पिंपळढव अनुसूचित जाती (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. उमरी तालुक्यातील गोरठा सर्वसाधारण (महिला), तळेगाव अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. धर्माबाद तालुक्यातील करखेली सर्वसाधारण महिला, येताळ सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. बिलोली तालुक्यातील आरळी अनुसूचित जमाती (महिला), सगरोळी सर्वसाधारण, रामतीर्थ ना.मा.प्र., लोहगाव सर्वसाधारण (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. नायगाव खै. तालुक्यातील बरबडा ना.मा.प्र. (महिला), कुंटूर ना.मा.प्र., देगाव अनुसूचित जमाती, मांजरम ना.मा.प्र., नरसी सर्वधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. लोहा तालुक्यातील सोनखेड अनुसूचित जाती, वडेपुरी अनुसूचित जाती (महिला), उमरा ना.मा.प्र. (महिला), कलंबर अनुसूचित जाती, सावरगाव अनुसूचित जाती, माळाकोळी ना.मा.प्र.साठी आरक्षण जाहीर झाले आहे. कंधार तालुक्यातील शिराढोण ना.मा.प्र. (महिला), कौठा सर्वसाधारण, बहाद्दरपुरा अनुसूचित जाती (महिला), फुलवळ सर्वसाधारण (महिला), पेठवडज सर्वसाधारण (महिला), गौळ अनुसूचित जाती (महिला), कुरूळा सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे. मुखेड तालुक्यातील जांब बु. ना.मा.प्र., चांडोळा सर्वसाधारण, एकलारा ना.मा.प्र. (महिला), येवती सर्वसाधारण (महिला), सावरगाव पी. अनुसूचित जाती (महिला), बाऱ्हाळी सर्वसाधारण, दापका गु. सर्वसाधारण (महिला), मुक्रामाबाद ना.मा.प्र. (महिला)साठी आरक्षण जाहीर झाले आहे. देगलूर तालुक्यातील खानापूर सर्वसाधारण, शहापूर सर्वसाधारण, करडखेड अनुसूचित जमाती (महिला), मरखेल सर्वसाधारण (महिला), हानेगाव सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षण जाहीर झाले आहे.

00000

 दहा नगरपरिषदांच्या आरक्षण निश्चितीबाबत  

हरकती व सूचना असल्यास 1 ऑगस्टपर्यत कराव्यात

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड व हदगाव या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण(महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम-2022 जाहीर केलेला आहे.

 

या कार्यक्रमानुसार या दहा नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी 28 जुलै 2022 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. सदर आरक्षणाची प्रसिध्दी त्या दहा नगरपरिषदांच्या क्षेत्रात प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावरही या आरक्षणाची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

 

या आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींच्या हरकती व सूचना असतील त्यांनी कारणासह संबंधित नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांचेकडे शुक्रवार 29 जुलै ते सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करावे. 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

0000

 

 हिमायतनगर नगरपंचायतीच्या आरक्षण निश्चितीबाबत

हरकती व सूचना असल्यास 1 ऑगस्टपर्यत कराव्यात

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्य निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण(महिला) आरक्षण व सोडतीचा सुधारीत कार्यक्रम-2022 जाहीर केलेला आहे.

 

या कार्यक्रमानुसार हिमायतनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 28 जुलै 2022 रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. या आरक्षणाची माहिती रहिवाशांसाठी नगरपंचायत हिमायतनगर कार्यालयात उपलब्ध आहे. या आरक्षणाची प्रसिध्दी नगरपंचायत क्षेत्रात प्रमुख ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावरही या आरक्षणाची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

 

या आरक्षण निश्चितीबाबत ज्या कोणत्याही व्यक्तींच्या हरकती व सूचना असतील त्यांनी कारणासह मुख्याधिकारी नगरपंचायत हिमायतनगर यांचेकडे शुक्रवार 29 जुलै ते सोमवार 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत लेखी सादर करावे. 1 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 3 वाजेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे.

0000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 149 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, माहूर 2, बिलोली 1 असे एकूण 5 अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 3 हजार 117 एवढी झाली असून यातील 1 लाख 385 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 40 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात 3  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील 6 असे एकूण 9  रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 18, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7 खाजगी रुग्णालय 1 असे एकुण 40  व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 12 हजार 439
एकुण निगेटिव्ह स्वॅब-
 7 लाख 91 हजार 943
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती-
 1 लाख 3 हजार 117
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या-
 1 लाख 385
एकुण मृत्यू संख्या-2
 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
 97.35 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-00
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 02
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-40
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-00
0000

किटकनाशक फवारणी करतांना

शेतकऱ्यांनी अशी घ्यावी काळजी

-         कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेट्टे

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून शेतकरी किटकनाशकांची फवारणी करतात. शेतात किड, रोग किंवा तणाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी विविध रासायनिक औषधे फवारतात. ही रासायनिक औषधे फवारतांना मुख्यत तीन प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकावर फवारणी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी  डॉ. टी.जी. चिमणशेट्टे यांनी केले आहे.

 

शेतात किटकनाशके, तणनाशके वापरतांना घ्यावयाची काळजी :

रासायनिक औषधाचे अत्यंत बारीक कण श्वासोश्वासासोबत शरीरात जातात. फवारणी करीत असतांना त्वचेच्या संपर्कामधुन तथा डोळयाद्वारे शरीरात जातात. फवारणी करतांना नकळत तोंडाद्वारे खातांना  बीडी  पितांना शरीरात जाऊ शकतात.


किटकनाशके फवारणी करतांना सर्वसाधारणपणे घ्यावयाची काळजी :

गळके फवारणी यंत्र  वापरता ते दुरुस्त करुन वापरावे. किटकनाशके फवारणी यंत्रात भरताना सांडू नये यासाठी नरसाळयाचा (चाडीचा) वापर करावा. तणनाशके फवारणीसाठी वेगळा पंप वापरावा. तो पंप किटकनाशके वापरतांना संरक्षण कपडे वापरावेतफवारणीसाठी  वापरलेले सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवून ठेवावेत. झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून घ्यावेत. किटकनाशकाला हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. फवारणीचे मिश्रण हाताने  ढवळता लांब दांडयाचा किंवा काठीचा वापर करावा. किटकनाशके पोटात जाण्याची शक्यता असल्याने फवारणीचे मिश्रण करताना अथवा फवारणीच्या वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपा करणे टाळावे. फवारणीचे काम पुर्ण झाल्यावर हात साबनाने स्वच्छ धुवून खाणे -पिणे करावे. फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दुर ठेवावे. उपशीपोटी फवारणी  करता फवारणीपुर्वी न्याहारी करावी. फवरणी करतांना वापरलेली भांडी इ. साहित्य नदी, नाला किंवा विहीरी जवळ धुवू नयेत. तर धुतांना वापरलेले पाणी त्यात विषारी अवशेष असल्याने पडी  जमिनीत अथवा मातीत गाडावे. किटकनाशक रिकाम्या बाटल्या वापरानंतर नष्ट करुन टाकाव्यात. फवारणी करतांना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुकू नये अथवा हवा तोंडाने आत ढू नये. यासाठी सोयीस्कार तार, काडी किंवा टाचणी वापरावी. किटकनाशक फवारतांना अंगावर पडू नये म्हणून वाऱ्यांच्या विरुध्द दिशेने फवारणी करु नये. किटकनाशक फवारतांना संरक्षक पोशाख, चष्मा, हातमोजे यांचा वापर केल्याशिवाय फवारणी करु नये. किटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान दोन आठवडे जावू देऊ नये. जमिनीवर सांडलेले किटकनाशक हातांनी  पुसता  त्यावर पाणी  टाकता ती माती / चिखल यांच्या साहयाने शोषुन घ्यावेत  जमिनीत गाडून टाकावीत. डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे कळजीपुर्वक लक्ष घ्यावे. लाल रंगाचे चिन्ह / खुणा असलेली औषधी विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा  हिरवा असा कृम लागतो. कृषि विद्यापीठने पिकास शिफारस केल्यानुसार किटकनाशक मात्रा वापरावी, जास्त मात्रा वापरु नये. एका पेक्षा जास्त किटकनाशकाचे मिश्रण फवारणी करतांना वापरावे टाळावे. किटकनाशक फवारणीसाठी वापरतांना  खरेदी करतांना त्याची अंतिम मुदत तपासावी.


विषबाधा झाल्याची लक्षणे  उपाययोजना :

विषबाधा ही किटकनाशके / तणनाशके यांचा त्यांचेशी संपर्क किंवा पोटात गेल्यास होते. विषबाधा  इतर आजार यांच्या लक्षणात बरेचदा साम्य राहू शकते.

विषबाधाची लक्षणे :

अशक्तपणा  चक्कर येणे. त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे. डोळयाची जळजळ होणे, पाणी येणे, अधुंक दिसणे. तोंडातून लाल गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे, पोटात दुखणे. डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायुदुखी, जिभ ळुली पडणे, बेशुध्द होणे, धाप लागणे, छाती दुखणे, खोकला येणे.

 

विषबाधेची शंका असल्यास खात्री करा : रोग्याचा  किटकनाशकांसह संपर्क आला होता काय? नेमके कोणते किटकनाशके वापरले? शरीरात किती गेले?  केंव्हा गेले? डॉक्टरांसाठी  वरील माहिती महत्वाची आहे.

विषबाधेवर तातडीने करावयाचे प्रथमोपचार :

किटकनाशके / तणनाशके डोळयांत उडाल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनीटापर्यंत पाण्याची धार सोडून धुवावे. शरीरावर उडाले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे  दवाखान्यात न्यावे. विषबाधे नंतर रोगी जर पुर्ण शुध्दीवर असेल तरच उलटी करण्यास प्रवृत्त करावे. अन्यथा 3 चमचे बारीक लाकडी  कोळसा भुकटी करुन अर्धा ग्लास पाण्यातून पाजा  लगेच दवाखान्यात न्या. विषारी औषध कपडयावर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला  रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहचवा.

00000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...