Thursday, June 30, 2022

 नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  230 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, नागपूर 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 893 एवढी झाली असून यातील 1 लाख 156 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 45 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणातील 1 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण  3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 39, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3 असे एकुण 45 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 29

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 812

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 893

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 156

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-45

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

 कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांस

सानुग्रह सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 30मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार व शासन निर्णयान्वये कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याची ही योजना 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. कोविड या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रुपये 50 हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याच्या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुढील प्रमाणे राहील. दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

 

कोविड-19 या आजारामुळे 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच 24 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. दिनांक 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्युच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या  आत अर्ज करावेत. या योजनेखाली अर्ज करण्यासाठी नमूद केलेल्या मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हाणे निवारण समिती (जीआरसी)  मार्फत  करता येतील. या योजनेसाठी ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे. त्यांच्याविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येईल असेही कळविले आहे.

 

सदर ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करुन अद्यापही ज्या अर्जदारांना 50 हजार सानुग्रह सहाय्य त्यांचे बँक खात्यात जमा झालेले नाही. अशा अर्जदारांनी 8 जुलै 2022 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्रभागजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे येऊन पैसे जमा झाले किंवा कसे याची खात्री करावी. पैसे जमा झाले नसल्यास किंवा ऑनलाईन अर्ज करताना बँक खाते नंबर चुकीचा टाकलेला असल्यास तो दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या नावाने आवक जावक विभागात अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी. अर्जदाराचे बँक पासबुक व त्याची एक झेरॉक्स प्रतअर्जदाराच्या बँक खात्याचे माहे जानेवारी २०२२ ते माहे जून २०२२ या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट अर्जदाराने ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जाचा क्रमांक (अप्लीकेशन आयडी)इत्यादी .

0000

 जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्र वितरणासाठी

प्रशासनाच्यावतीने 75 शिबिराचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना संगणकिय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी) देण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणताही दिव्यांग त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा शल्य चिकित्सक, श्री. गुरु गोविंदसिंघजी मेमोरिअल रुग्णालय नांदेड व अधिष्ठाता, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांची संयुक्त समिती नियुक्त केली आहे. या समितीद्वारे जिल्ह्यातील एकूण 75 शिबिराचे 1 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे.

 

आयोजित केलेल्या शिबिराचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. तालुका, शिबिराचे ठिकाण, एकूण शिबिर, दिवस, तारीख याप्रमाणे आहेत. नांदेड शहरात जिल्हा रुग्णालय नांदेड येथे एकूण 11 शिबिरांचे दिनांक 4,5,11,12,18,19,25,26 जुलै आणि 1,2,8, ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे एकूण 12 शिबिरांचे दि. 1,2,8,9,15,16,22,23,29,30 जुलै व 5, 6 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 4 शिबिरांचे दि. 6, 20, 27 जुलै व 3 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 3 शिबिरांचे दिनांक 7,11 जुलै व 4 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय हदगांव येथे 6 शिबिरांचे दि. 1,8,15,22,29 जुलै व 5 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे 4 शिबिरांचे दि. 6,13,27 जुलै व 3 ऑगस्ट 2022 रोजी आणि 4 शिबिरांचे दिनांक 4,11,15, जुलै व 8 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 3 शिबिरांचे दि. 2,16 जुलै व 6 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे 8 शिबिरांचे दिनांक 4,7,18,25,28 जुलै व 1 व 4 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे 5 शिबिरांचे  दिनांक 6,13,20,27 जुलै व 3 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन  करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे  4 शिबिरांचे दिनांक 5,12,26 जुलै व 2 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 10 शिबिरांचे दिनांक 2,9, 13,16,20,23, 27,30 जुलै व 3 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन केले आहे. ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 2 शिबिरांचे 20 जुलै व 4 ऑगस्ट 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. वरील शिबिराच्या दिवशी दिव्यांग व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच.एडके यांनी केले आहे.

00000 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गंत विद्यार्थ्यांनी त्रुटीच्या

पुर्ततेसाठी 15 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन


नांदेड (जिमाका) दि. 30भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतर्गंत शैक्षणिक वर्ष 2020-21 व 21-22 या दोन्ही वर्षाचा लाभ देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गर्दी होवू नये म्हणून 11 वी व 12 वी आणि आयटीआय या अभ्यासक्रमाच्या पात्र व त्रुटीच्या याद्या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात दर्शनीय ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी  आपल्या नावासमोर असलेल्या त्रुटीची पुर्तता करुन 15 जुलै 2022 पर्यत अर्ज कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे. उर्वरित बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अर्जाची छाननी अंतिम टप्प्यात असून छाननी पूर्ण होताच याद्या प्रसिध्द करण्यात येतील, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळाच्या अनुदान,

बिजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 

नांदेड, (जिमाका) दि. 30:- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. नांदेड जिल्हा कार्यालयास सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजनेअंतर्गत 20 लाभार्थी व बीज भांडवल योजनेअंतर्गत 16 लाभार्थ्यांचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज 1 ते 30 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.30 ते सायं 6.15 वाजेपर्यंत) जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेसमोर तळमजला, कामठा रोड, नांदेड येथे स्विकारले जातील. 

 

या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडून विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत पुढील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपसिथत राहून दाखल करावीत. त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. 

 

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे लागतील. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला, तहसीलदार यांच्याकडून घेतलेला अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला. नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तीन प्रतीत जोडावे. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला. राशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्डची झेरॉक्स प्रत, व्यवसायाचे दरपत्रक, व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती, करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा (नमुना नंबर आठ), लाईट बील, टॅक्स पावती, बिजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स परवाना बॅच, व्यवसायाचे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला. अनुदान न घेतल्याबाबत प्रतिज्ञापत्र याप्रमाणे कागदपत्रे स्वयंसांक्षाकित करुन घोषणापत्र देण्यात यावे. 

 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, ढोर, मोची, होलार, समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजू अर्जदारांनी योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक अरण राउत यांनी केले आहे.

00000

 कृषि दिनानिमित्त नांदेड जिल्ह्याच्या सर्व शाळांमध्ये होणार शेती आणि शेतकऱ्यांचा जागर - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


नांदेड (जिमाका) दि. 30 :- संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांकडे मोठ्या गौरवाने पाहिले जाते. कृषिक्षेत्राशी निगडीत निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानातून स्वत:ला सावरत शेतीला सावरण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शेतकऱ्यांनी समर्थपणे पेलवली आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा, श्रमाचा यथोचित गौरव होण्यासमवेत नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळांमध्ये शेती आणि शेतकऱ्यांचा जागर करण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा परिषदेने घेतला आहे. या उपक्रमातून शेतकऱ्यांच्या शाळेत शिकणाऱ्या नव्या पिढीला शेतीविषयी अधिक लळा लागावा, आवड उत्पन्न व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहय्याने प्रगतशील शेतीचा मंत्र त्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली.

या अभिनव उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यातील काही निवडक गावात वृक्ष लागवडीचे उद्दीष्टही देण्यात आले आहे. याचबरोबर पाण्याचे मोल लक्षात यावे यासाठी जलपूजन, पाणी बचतीसाठी व जमिनीत मुरविण्यासाठी पूर्नभरण, आपल्याच शेतात उत्पादित झालेल्या गुणवत्तापूर्ण बियांणांना बाजूला काढून पेरणीपूर्वी त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने आवश्यक असलेली बीज प्रक्रिया, बीबीएफ पद्धतीने पेरणी आदी बाबत माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली शेती आणि आपला गाव याविषयी आत्मविश्वास वृद्धींगत व्हावा यादृष्टीने शाळांमध्ये शेतीशी निगडीत माहिती पोहचवली जाणार आहे. यात आपल्या राज्यातील पिके, जिल्ह्यातील पिके, हरितक्रांतीतून साधलेली स्वयंपूर्ण: गळीत धान्याच्या उत्पादनासाठी स्वावलंबी बाणा, सोयाबीन लागवड, कापसा ऐवजी इतर पिकांवर शेतकऱ्यांचा वाढलेला कल, वृक्षलागवड, शेतीतील अर्थकारण, फळे, दूध, भाजीपाला याबाबत सजगता आदी विषयाची ठळक माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल.
00000

Wednesday, June 29, 2022

 नांदेड जिल्ह्यात 18 व्यक्ती कोरोना बाधित

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  265 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 13, नांदेड ग्रामीण 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3 असे एकूण 18 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 884 एवढी झाली असून यातील 1 लाख 153 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 39 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 3 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण  3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3 असे एकुण 39 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 799

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 592

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार884

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 153

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-39

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

 

0000

 व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी  अपंग प्रशिक्षण केंद्रात अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि.29:- व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला-मुलींसाठी तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत प्रवेश देण्यात येत आहे. इच्छुक अपंग मुला-मुलींनीपालकांनी शुक्रवार 15 जुलै 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरीनगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड मोबाईल क्रमांक 9960900369, 9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे आवाहन देगलूर तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण संस्थेच अधिक्षक यांनी केले आहे.  

 

प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण ( सीसीईन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॅाम्प्युटर टायपिंग)वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवण व कर्तनकला आणि इलेक्ट्रीशिएन अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येत आहे.

 

संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकीय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची  विनामुल्य सोय केली आहे.

 

0000

 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या

नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि.29 :-महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाअंतर्गत सहआयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड मुख्यालय औरंगाबाद 16 डिसेंबर 2021 पासून समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर समितीचे कार्यालय पुढील पत्त्यावर सुरु करण्यात आले आहे. तरी संबंधितानी पुढील नमूद पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन किनवट मुख्यालय औरंगाबाद अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपाध्यक्ष विजयकुमार कटके यांनी केले आहे.

 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट जि. नांदेड (मुख्यालय औरंगाबाद) कार्यालयाचा पत्ता याप्रमाणे आहे. सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट (मुख्यालय औरंगाबाद). प्लॉट नं. 4 , सेक्टर सी-1, टाऊन सेंटर, सारस्वत बँकेजवळ, सिडको औरंगाबाद -431 003 कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक- 0240-2991137 व ई-मेल आयडी क्र. tcskin.mah@gmail.com  हा आहे.

0000

 डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी

इच्‍छुक मदरसांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत राज्‍यातील नोंदणीकृत मदरसांना पायाभूत सुविधा, ग्रंथालय आणि विषय शिक्षकांच्‍या वेतनासाठी सहाय्यक अनुदान सन 2022-23 योजना राबविण्यात येत आहे.

इच्‍छुक मदरशांनी शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 मध्‍ये नमूद केलेल्‍या विहित नमुन्‍यातील परिपूर्ण अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह जिल्‍हा नियोजन समितीजिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड येथे 30 ऑगस्ट 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. त्यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयात प्राप्‍त होणारे प्रस्‍ताव विचारात घेतले जाणार नाहीत.

राज्यातील नोंदणीकृत मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्‍यांसाठी ज्‍या मदरसांना आधुनिक शिक्षणासाठी शास‍कीय अनुदान घेण्‍याची इच्‍छा आहेअशा मदरसांकडून अल्‍पसंख्‍यांक विकास विभाग अर्ज मागवित आहे. मदरसे धर्मदाय आयुक्‍त अथवा महाराष्‍ट्र राज्‍य वक्‍फ बोर्डाकडे नोंदणीकृत असावेत. अशा मदरशानी शासन निर्णय 11 ऑक्‍टोबर 2013 च्‍या तरतूदीनुसार विहित नमुन्‍यात अर्ज करावेत.

विज्ञानगणितसमाजशास्‍त्रहिंदीमराठीइंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्‍याकरिता शिक्षकांसाठी मानधनपायाभूत सुविधा व ग्रंथालयासाठी अनुदानशासन निर्णयातील तरतूदीनुसार मदरसामध्‍ये नियुक्‍त केलेल्‍या जास्‍तीतजास्‍त तीन डीएडबीएड शिक्षकांना मानधन देण्‍यात येईल. विद्यार्थी व शिक्षकांचे  प्रमाण 40:1 असे राहील. शिक्षणासाठी हिंदीइंग्रजीमराठीउर्दू यापैकी एका माध्‍यमाची निवड करुन त्‍यानुसार शिक्षकांची नेमणूक करणे आवश्‍यक आहे.

ग्रंथालयासाठी तसेच विद्यार्थ्‍यांकरिता शैक्षणिक साहित्‍यासाठी एकदाच 50 हजार रुपये अनुदान देय आहे. पायाभूत सुविधासाठी जास्‍तीतजास्‍त 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देय आहे.

या योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्‍या पायाभूत सुविधा मदरशांच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजीपेय जलाची व्‍यवस्‍था करणेप्रसाधन गृह उभारणे व त्‍याची डागडुजी करणेविद्यार्थ्‍यांसाठी आवश्‍यक फर्निचर, मदरसाच्‍या निवासस्‍थानात इन्‍वहर्टरची सुविधा उपलब्‍ध करणेमदारसांच्‍या निवासी इमारतीचे नूतनीकरण व डागडुजीसंगणकहार्डवेअरसॉफटवेअरप्रिंटर्स इत्यादीप्रयोगशाळा साहित्‍य सायन्‍स कीट, मॅथेमॅटीक्‍स कीट व इतर अध्‍ययन साहित्‍यांचा समावेश आहे.

या योजनेंतर्गत लाभासाठी नोंदणी करून 3 वर्ष पूर्ण झालेल्‍या तसेच अल्‍पसंख्‍यांक बहुल क्षेत्रातील मदरशांना प्राधान्‍य देण्‍यात येईल. ज्‍या मदरशांना Scheme for Providing Quality Education in Madarsa (SPQEM) या केंद्र पुरस्‍कृत योजनेंतर्गत लाभ मिळाला आहेअशा मदरसांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत शासन निर्णय 11 ऑक्टोंबर 2013 व अर्जाचा नमुनाआवश्‍यक कागदपत्रांची  यादी http://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा उच्‍चस्‍तरीय निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...