Saturday, October 30, 2021

नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाची गट ड पदाची परीक्षा 31 ऑक्टोंबर रोजी                                                                                                                                              

नांदेड (जिमाका) 30 :- सार्वजनिक आरोग्य विभागाची गट ड मधील विविध पदांसाठी 31 ऑक्टोंबरला दुपारी 2 ते 4 यावेळेत जिल्ह्यात 57 केंद्रावर परीक्षा होणार असून एकुण 14 हजार 571 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नांदेड शहर तसेच परिसरातील एकुण 57 केंद्रांची निवड करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. दिव्यांग परीक्षार्थ्यांची शनिवारी तपासणी करुन यांना लेखनिक यांचा पुरवठा देखील होणार आहे.

 

या परीक्षेसाठी येणाऱ्या परीक्षार्थी यांची केंद्रावर तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेसाठी लागणारे साहित्य तसेच तयारीचा आढावा घेण्यात आलेला असून सर्व परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व परीक्षार्थी यांनी केंद्रावर दिलेल्या नियोजित वेळेवर पोहचून गर्दी टाळावी. कोरोनाबाबतचे शासनाचे नियम पाळण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

00000

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी खासगी विद्यार्थ्यांना

22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार

विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका), दि. 30 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या (फॉर्म नं. 17 भरून) प्रविष्ट होण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. 

 

या सुविधेनुसार विद्यार्थी 22 नोव्हेंबरपासून नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरू शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करता येतील. इ. दहावीसाठी http://form17.mh-ssc.ac.in तर इ. बारावीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच हे अर्ज भरावयाचे आहेत. त्याचबरोबर दि. 11 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस खासगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याचे नावनोंदणीसाठी (प्रथम मुदत व द्वितीय मुदतवाढ यामधील) प्राप्त अर्जातील दुरूस्त्या करण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित विद्यार्थ्यी आपल्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधू शकतील.

 

विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याकरिता 1) शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र 2) आधारकार्ड 3) स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो आवश्यक असून ऑनलाईन अर्ज भरताना कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची आहेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य असणार आहे. संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला त्याने अर्जात नमूद केलेल्या ई-मेलवर पाठविली जाईल. विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नाव नोंदणी अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत.

 

खासगी विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावीसाठी एक हजार रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल तर इयत्ता बारावीसाठी 500 रूपये नोंदणी शुल्क तर 100 रूपये प्रक्रिया शुल्क असेल. एकदा नाव नोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नाव नोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही, तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, संपर्क केंद्र अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नाव नोंदणी शुल्क जमा करावे लागेल.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ट व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करून अर्जासोबत सादर करावी.

 

विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र अथवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील सूचना वाचून अर्ज भरावेत तसेच अर्ज भरताना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्र. ०२०- २५७०५२०७/ २५७०५२०८ अथवा २५७०५२७१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी केले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 5 व्यक्ती कोरोना बाधित

तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 676 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 403 एवढी झाली असून यातील 87 हजार 718 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 33 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, कंधार तालुक्यांतर्गत 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे देगलूर 1 असे एकुण 5  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 4  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 4  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 33 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणा 7,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, खाजगी रुग्णालय 4 असे एकुण 33 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 54 हजार 31

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 50 हजार 360

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 403

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 718

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.2 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-33

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

00000

 देगलूर पोटनिवडणूकीसाठी सायं 5 वाजेपर्यंत 60.92 टक्के मतदान 

नांदेड (जिमाका) 30 :- 90-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे. या मतदान प्रक्रीयेत पुरुष मतदाराची एकुण संख्या 1 लाख 54 हजार 92 तर स्त्री मतदारांची एकुण संख्या 1 लाख 44 हजार 256 आहे. इतर 5 असे एकूण 2 लाख 98 हजार 353 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

त्यापैकी आज सकाळी 7 ते सायं 5 वाजेदरम्यान मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पुरुष मतदार 94 हजार 227 तर स्त्री मतदार 87 हजार 523 असे एकुण 1 लाख 81 हजार 750 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सायं 5 वाजेपर्यंत मतदान पार पडलेली टक्केवारी 60.92 आहे.

0000

 विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाला आरंभ;

मतदार नोंदणी सुरू 

       मुंबईदि. 29 : पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून१ नोव्हेंबरपासून १ जानेवारी २०२२ रोजी १८ किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे.

            1 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयामध्ये प्रारूप यादी प्रकाशित केली जाईल. मतदारांनी आपले नावपत्तालिंगजन्मदिनांकवयओळखपत्र क्रमांकमतदारसंघ इ. तपशील मतदार यादीत तपासून ते अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाहीअशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. त्यामुळे मतदारांनी प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील आत्ताच तपासणे महत्त्वाचे आहे.

            १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ हा कालावधी मतदार नोंदणीचा आहेतसा तो एखाद्याच्या नावासंबंधी हरकती घेण्याचाही आहे. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्त्यावर राहत नसेलतर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणेही महत्त्वाचे असते.

            यंदाच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने राज्यभर मतदार नोंदणीची मोहीम राबवणार आहे. तसेचतृतीय पंथी नागरिकदेह व्यवसाय करणाऱ्या महिलादिव्यांग व्यक्ती यांच्या नाव नोंदणीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने मोहीम राबवली जाणार आहे. मतदार नोंदणीसाठी नोव्हेंबरमधील १३-१४ आणि २७-२८ तारखांना राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. तसेचग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने १६ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या दिवशी राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिकलग्न होऊन गावात आलेल्या स्त्रियागावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावेमृत व्यक्तीगावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्तीलग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल.

            येत्या काळात अनेक महानगरपालिकानगरपालिकाजिल्हापरिषदापंचायत समित्या यांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि नगरपालिका येथे प्रभागानुसार मतदार अर्ज स्वीकृती केंद्रे उभारली जाणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी नव्याने मतदार म्हणून पात्र प्रत्येक युवकांने मतदार यादीत आपले नाव नोंदवावेतसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपला तपशील अचूक आहेत का याची खात्री करून घ्यावीअसे आवाहन केले आहे.

            मतदारांमध्ये निवडणूकलोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण व्हावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणुकीतील सहभाग’ (Systematic Voters’ Education and Electoral Participation- SVEEP) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्याक्रमांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करण्यासाठी परिपत्रके काढलेली आहेत. आज शाळा-महाविद्यालयांमधून शिकणारे विद्यार्थी सुजाण नागरिक झाले तरच देशात लोकशाही साक्षरता निर्माण होईलहा विचार हे व्यासपीठ स्थापन करण्यामागे आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही मूल्यांची रुजवण आणि शिक्षकांची भूमिका’ हा कार्यक्रम आणि लोकशाही गप्पा (भाग-एक)’ हे कार्यक्रम घेण्यात आले होते. या लोकशाही गप्पांमध्ये डॉ. सुहास पळशीकरप्रवीण महाजनश्रीरंग गोडबोलेनागराज मंजुळेरवींद्र धनकश्रुती गणेश हे मान्यवर सहभागी झाले होते.

            स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये निवडणूकलोकशाही यांविषयीची जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी यंदा घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा (उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा)लोकशाही भोंडला या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सध्या लोकशाही दीपावली ही स्पर्धा सुरू आहे.

0000

 पात्र तरुणांनी मतदार नोंदणी करावी

-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

                                      ·         विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या आरंभानिमित्त परिसंवादाचे आयोजन

           

            मुंबईदि. 29 : पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू झाले असून1 नोव्हेंबर पासून 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेल्या नागरिकांना मतदार म्हणून नाव नोंदवता येणार आहे. या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही आणि माध्यमांची भूमिका’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मतदार नोंदणीस पात्र तरुणांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करावीअसे आवाहन केले.

            विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाविषयी श्री. देशपांडे म्हणाले की1 नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रारूप मतदार यादी प्रकाशित होणार आहे. मतदारांनी ही यादी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा ऐन मतदानाच्या दिवशी यादीत नाव सापडत नसल्याच्या मतदारांच्या तक्रारी येतातमात्र मतदारांनी आत्ताच ही यादी तपासून आपले तपशील योग्य असल्याची खात्री केली तर पुढे अडचण येणार नाही. तसेच1 जानेवारी 2022 रोजी ज्यांचे वय 18 किंवा अधिक असेलत्या नागरिकांना 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत  मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. या नागरिकांचे नाव 5 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम यादीत समाविष्ट केले जाईलअशी माहिती देशपांडे यांनी दिली.

            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे म्हणाले कीराज्य निवडणूक कार्यालय करत असलेल्या कामांची दखल माध्यमे घेतात. मात्र दरम्यानच्या काळातही निवडणूक विभाग मतदान जनजागृती (स्वीप) हा उपक्रम राबवत असते. या उपक्रमात मतदार यादीयादीचे पुनरीक्षण केले जाते या मतदार नोंदणी कार्यक्रमाला प्रसिद्धी देणे आवश्यक आहे.

            या परिसंवादात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  महाराष्ट्र टाइम्सचे श्रीकांत बोजेवारनवाकाळच्या जयश्री खाडीलकरझी चोवीस तासचे निलेश खरेलोकमतचे निवासी संपादक विनायक पात्रुडकर(माहिती व जनसंपर्क महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे), साम टीव्हीचे प्रसन्न जोशीमुंबई तकचे साहिल जोशीमराठी पत्रकार संघाचे अजय वैद्य आणि राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकरमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे  अध्यक्ष मंदार पारकर हे मान्यवर उपस्थित होते.

            श्री. श्रीकांत बोजेवार म्हणाले कीमतदानाच्या वेळी एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणेने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. माध्यमांनीही लोकशाही टिकविण्यासाठी पुढे आले पाहिजे. ईव्हीएम मशीनवर विभागनिहाय मतमोजणी दाखविली जाते. त्यामुळे त्या-त्या भागात कोणाला मतदान केले गेले याचा अंदाज येतो. यासाठी एकत्रित मतमोजणी जाहीर झाली पाहिजे.             मतदानाच्या दिवशी सार्वत्रिक सुट्‌टी असतेमात्र काही नागरिक मतदान न करता बाहेर फिरायला जातात. असे होऊ नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहेअसे मत जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केले.

            श्री. निलेश खरे म्हणाले कीनोंदणी सोपी व्हावीविनायक पात्रुडकर म्हणाले कीलोकशाही रुजवण्यासाठी माध्यमे आणि निवडणूक आयोग यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न करायला हवेत. माध्यमांना यासंदर्भातील जबाबदारीची जाणीव असली तरी त्यांनी अधिक नेटकेपणाने यासाठी प्रयत्न करायला हवेत.

            श्री. प्रसन्न जोशी म्हणाले कीदुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक आयोग करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. आज समाजमाध्यमांची वाढ अतिशय झपाट्याने होत असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा कल्पकतेने वापर करायला हवा. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर कॅच देम यंगसारखे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे. साहिल जोशी म्हणाले कीएखादा पक्ष निवडणुकीच्या दरम्यान जाहीर केलेल्या जाहीरनाम्याची नंतर किती अंमलबजावणी करतोयाबाबतची शहानिशा निवडणूक आयोगाने करणे गरजेचे आहे.

            माध्यम प्रतिनिधीचे श्री. मंदार पारकर म्हणाले कीनिवडणूक कार्यालयाने तालुका आणि ग्रामपातळीवर मदत घेतली पाहिजे. अजय वैद्य यांनी मतदारांना लोकशिक्षणाची अत्यंत गरज असून लोकप्रतिनिधी कोणकोणत्या कामाचा अधिकार देण्यात आला आहेयाची माहिती मतदारांना करून द्यावीअसे मत व्यक्त केले.

            परिसंवादातील सर्व मान्यवरांचे संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक पवार यांनी केले,  तर स्वीप सल्लागार दिलीप शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

0000

 देगलूर पोटनिवडणूकीसाठी दुपारी 3 वाजेपर्यंत 48.47 टक्के मतदान                                                           

नांदेड (जिमाका) 30 :- 90-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरु आहे.  या मतदान प्रक्रीयेत पुरुष मतदाराची एकूण संख्या 1 लाख 54 हजार 92 तर स्त्री मतदारांची एकूण संख्या 1 लाख 44 हजार 256 आहे. इतर 5 असे एकूण 2 लाख 98 हजार 353 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 

त्यापैकी आज सकाळी 7 ते 3 या दरम्यान मतदान झालेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पुरुष मतदार 73  हजार 212 तर स्त्री मतदार 71 हजार 390 असे एकूण 1 लाख 44 हजार 602 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान पार पडलेली टक्केवारी 48.47 आहे.

0000

Friday, October 29, 2021

 नांदेड जिल्ह्यात 4 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 620 अहवालापैकी 4 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 4  तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 398 एवढी झाली असून यातील 87 हजार 714 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 32 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा 1, यवतमाळ 1, असे एकूण 4  बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 2  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 2  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 32 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणा 6,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16, खाजगी रुग्णालय 4 अशा एकूण 32 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 53 हजार 355

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 49 हजार 712

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 398

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 714

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-01

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-05

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-32

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...