Sunday, May 30, 2021

 

नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित

3 जणांचा मृत्यू तर 221 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 209 अहवालापैकी  150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 61 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 367 एवढी झाली असून यातील 85 हजार 640 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 372 रुग्ण उपचार घेत असून 39 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  29 मे 2021 रोजी डेल्टा कोविड रुग्णालयात छत्रपती चौक नांदेड येथील 60 वर्षाच्या महिलेचा, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे सांगवी नांदेड येथील 60 वर्षाची महिला, 30 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे काबरानगर नांदेड येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 883 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 33, बिलोली तालुक्यात 1, लोहा 1, नायगाव 2, नांदेड ग्रामीण 6, देगलूर 2, माहूर 3, अर्धापूर 2, हदगाव 2, मुदखेड 1, भोकर 2, हिमायतनगर 2, मुखेड 4 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 45, कंधार तालुक्यात 2, मुदखेड 2, नाशिक 1, नांदेड ग्रामीण 13, किनवट 4, मुखेड 2, पुणे 1, अर्धापूर 1, लोहा 3, हिंगोली 4, हदगाव 3, माहूर 5, परभणी 3 असे एकूण 150 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 221 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 20, बारड कोविड केअर सेंटर 1, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, लोहा कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, माहूर तालुक्यांतर्गत 1, किनवट कोविड रुग्णालय 2, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 146, धर्माबाद कोविड केअर सेंटर 3, बिलोली तालुक्यांतर्गत 4, भोकर तालुक्यांतर्गत 8 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 372 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 38, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 25, माहूर कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3,  नायगाव कोविड केअर सेंटर 3, उमरी कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 6, भोकर कोविड केअर सेंटर 1, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 13, बिलोली कोविड केअर सेंटर 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 768, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 306, खाजगी रुग्णालय 103 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 111, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 39 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 37 हजार 418

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 37  हजार 140

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 367

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 640

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 883

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.82 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-36

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-185

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 372

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-39

00000

 

जिल्ह्यातील 91 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 30 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 31 मे रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाणा हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको  या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, हिमायतनगर, कंधार या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी व उमरी या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 70 डोस, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोव्हॅक्सीनचे 50, ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे कोव्हॅक्सीनचे 20 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 29 मे पर्यंत एकुण 4 लाख 25 हजार 524 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 30 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 130 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 11 हजार 860 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 11 हजार 990 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

000000

Saturday, May 29, 2021

 

जिल्ह्यातील 94 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 94 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 30 मे रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 11 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय,  हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको  या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, हैदरबाग, शिवाजीनगर, कौठा, जंगमवाडी, दशमेश, श्रावस्तीनगर (विजयनगर) व सिडको या 11 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, कंधार, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बिलोली, भोकर या 13 केंद्रावर  कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 120 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे कोव्हॅक्सीनचे 80, ग्रामीण रुग्णालय बारड येथे कोव्हॅक्सीनचे 50 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 28 मे पर्यंत एकुण 4 लाख 24 हजार 325 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 29 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 86 हजार 330 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 8 हजार 860 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 95 हजार 190 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

000000

 

नांदेड जिल्ह्यात 183 व्यक्ती कोरोना बाधित

5 जणाचा मृत्यू तर 209 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 844 अहवालापैकी  183 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 87 तर अँटिजेन तपासणीद्वारे 96 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 217 एवढी झाली असून यातील 85 हजार 419 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 451 रुग्ण उपचार घेत असून 48 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  28 मे 2021 रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल येथे हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथील 55 वर्षाच्या एका महिलेचा, भोकर तालुक्यातील बेंबर येथील 65 वर्षाचा पुरुष, नायगाव तालुक्यातील देगाव येथील 50 वर्षाचा पुरुष तसेच 29 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील 40 वर्षाच्या एका महिलेचा आश्विनी कोविड रुग्णालय, आसरानगर नांदेड येथील 70 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 880 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 42, बिलोली तालुक्यात 2, लोहा 4, परभणी 3, नांदेड ग्रामीण 13, धर्माबाद 4, मुखेड 1, बीड 1, अर्धापूर 1, हदगाव 2, नायगाव 4, भोकर 3, कंधार 3, यवतमाळ 4 तर  ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 46, हिमायतनगर 2, नायगाव 3, हिंगोली 4, नांदेड ग्रामीण 16, किनवट 3, उस्मानाबाद 1, माहूर 9, दिल्ली 1, हदगाव 3, मुखेड 4, परभणी 1 असे एकूण 183 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 209 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5, बारड कोविड केअर सेंटर 6, माडवी कोविड केअर सेंटर 2, हदगाव कोविड रुग्णालय 4, लोहा कोविड रुग्णालय 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, माहूर तालुक्यांतर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 10, खाजगी रुग्णालय 45 मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 115, धर्माबाद कोविड केअर सेंटर 2, बिलोली तालुक्यांतर्गत 4, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 2 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 1 हजार 451 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 41, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 25, बारड कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 22, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 10, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 3, भोकर कोविड केअर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 6, उमरी कोविड केअर सेंटर 3, कंधार कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 5, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 8, मुदखेड कोविड केअर सेंटर 2, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 3, बिलोली कोविड केअर सेंटर 13, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 7, एनआरआय कोविड केअर सेंटर 2, मांडवी कोविड केअर सेंटर 13, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 812, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 320, खाजगी रुग्णालय 108 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 117, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 109, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 39 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 34 हजार 100

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 34 हजार 21

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 217

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 85 हजार 419

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 880

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.74 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-187

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 451

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-48

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...