Wednesday, April 9, 2025

वृत्त क्रमांक 367

शुक्रवारी ‘गुंतवणूक परिषदचे आयोजन

औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

नांदेड, दि. ९ एप्रिल: जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2025’ दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल तुलसी कम्फर्ट, आनंदनगर रोड, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे उद्दिष्ट नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देणे, स्थानिक गुंतवणूक आकर्षित करणे व रोजगार निर्मितीला बळकटी देणे आहे.

परिषदेचे प्रमुख उद्देश: जिल्हास्तरावर गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे, उद्योजक व गुंतवणूकदारांना एकत्र आणणारे व्यासपीठ प्रदान करणे, जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेचा विकास करणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा आहे.

या परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांवरील चर्चासत्र, उद्योजकांचे अनुभव कथन, गुंतवणुकीच्या संधींची माहिती, इतर क्षमतावान क्षेत्रांमधील व्यवसाय संधींचा आढावा, तसेच सामंजस्य करार व स्वाक्षरीचे कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद पार पडणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, उद्योजक समूह, उद्योग क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, तसेच विविध शासकीय संस्था व विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

तरी जिल्ह्यातील होतकरू व नवउद्योजक, उद्योजक संघटना, उद्योग समूह, व्यावसायिक व औद्योगिक संस्थां यांनी शुक्रवार 11 एप्रिल 2025 रोजी या गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहून औद्योगिक विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.  724 देशाचा समृध्दीसाठी विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नांदेड, दि. 14 जुलै : जगात शि...