Wednesday, April 9, 2025

 विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद

11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत ‘संवाद मराठवाडयाशी’ उपक्रम

आठही जिल्हयातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत नागरिकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर दि.9: मराठवाडा विभागातील आठही  जिल्हयातील नागरिक आपल्या विविध कामानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. आपल्या प्रशासकीय समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिक येत असतात, मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा ‘संवाद मराठवाडयाशी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ येत्या 11 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

विभागीय आयुक्त श्री गावडे यांच्या संकल्पनेतून ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’  या उपक्रमाची सुरूवात झाली आणि संपूर्ण प्रशासन थेट गावात पोचले. या उपक्रमाच्या यशानंतर विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातून छत्रपती संभाजीनगर येथे प्रशासकीय कामानिमित्त येण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास थांबविण्यासाठी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे ‘संवाद मराठवाडयाशी’ या उपक्रमाची सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 एप्रिल रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत विभागीय आयुक्त श्री गावडे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाबाबत संवाद साधणार आहेत. श्री. गावडे यांच्यासमवेत यावेळी विभागीय पातळीवरील प्रशासकीय अधिकारीही उपस्थित असणार आहेत. प्रत्येक आठवडयात दर बुधवारी 4 ते 6 यावेळेत आयुक्त नागरिकांशी संवाद साधतील. प्रत्येक संवादावेळी प्रशासकीय विभाग व विषय ठरविण्यात येणार असून यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित विषयावर विभागीय आयुक्त श्री गावडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. 

नागरिकांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणीबाबत थेट विभागीय आयुक्त यांच्याशी संवाद साधता येणार आहे.  नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे अवाहन विभागीय उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले आहे.

याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

00000



 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   451   जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   नांदेड दि. 28 एप्रिल :   महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी ध्...