Thursday, August 8, 2024

 वृत्त क्र.  681

राष्ट्रीय मुख दिनानिमित्त ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेडदि. 8 ऑगस्ट : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दंतचिकित्सा विभागाने राष्ट्रीय मुख दिनाचे औचित्य साधून 7 ऑगस्ट रोजी ‘तंबाखूचा पुळका आरोग्याला विळखा’ या विषयावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता . हा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल] विष्णुपूरी  येथे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन  अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले.   

 

या कार्यक्रमाचे प्रमुख उदिष्ट विद्यार्थ्यांना दंत आणि मुख आरोग्याचे महत्व पटवून देणे आणि तंबाखूच्या व्यसनाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम समाजावून सांगणे हे होते. यासाठी विविध उपक्रम आणि स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. निबंध आणि रांगोळी स्पर्धा हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धामध्ये मोठया प्रमाणात उत्साहाने भाग घेतला आणि आपल्या सर्जनशीलतेतून तंबाखूच्या दुष्पपरिणामाचे चित्रण केले.

 

अधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण यांच्या उपस्थितीत विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. दंतशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भावना भगत, मुख्याध्यापिका श्रीमती उज्वला जाधव, श्री. वेद पाठक, डॉ. समीक्षा, डॉ. प्रतीक्षा इ. मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मुख आरोग्याचे महत्व आणि तंबाखूच्या व्यसनाचे गंभीर परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुशील येमले आणि डॉ. ऐश्वर्या चंद्रण यांनी खेळामध्ये होणाऱ्या इजा आणि त्यांच्यावर कशी काळजी घ्यावी याबाबत व्याख्यान दिले. यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या आयुष्यातील आरोग्याविषयक काळजीबद्दल जागरुकता निर्माण झाली.

 

कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करुन झाली. तसेच मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले. जे पर्यावरण संवर्धन आणि आरोग्याचे महत्व अधोरेखित करतात. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन डॉ. अरुण नागरिक यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले आणि विद्यार्थ्यामध्ये मुख आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात या उपक्रमाने मोलाचे योगदान दिले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  855   जिल्ह्यात  " हरित ऊर्जा सौर क्रांती "  मो ही म     ·    5 हजार   पेक्षा जास्त लोकसं ख्येचे गाव  मॉडेल सोलर व्ह...