कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मदत कक्ष
नांदेड दि. 9 :- आयोध्या येथील रामजन्म भूमि- बाबरी मस्जीद
विवादीत जागे संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांचेकडून 9 नोव्हेंबर 2019
रोजी निकालाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार नांदेड
जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्हादंडाधिकारी नांदेड कार्यालयामार्फत
प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आला आहे. तसेच याद्वारे जिल्हाधिकारी
कार्यालयात आपतकालीन नियंत्रण कक्ष स्थापीत असून ज्याचा दुरध्वनी क्रमांक
02462- 235077 हा आहे. याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असे आवाहन
जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment