Thursday, April 18, 2019

पहिल्यांदाच दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालविले मतदान केंद्र
नांदेड, दि. १८ः- नांदेड लोकसभा मतदारसंघात पहिल्‍यांदाच दिव्‍यांग कर्मचा-यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कला मंदिर जवळील नेहरू इंग्लिश स्कूलमध्ये दिव्‍यांगानी मतदान केंद्र चालवले. या मतदान केद्रांत दिव्‍यांग कर्मचारी एस. एस. मठपतीगणेश रायेवारकिशन केनेतुकाराम सुर्यवंशी , बाबुराव मोरे, व्‍यंकटी मुंडे, गणपत शिरसाठ, अशोक सोळंके, तुषार कुलकर्णी, पदृमिनी कासेवाड, आश्विनी केंद्रे, आदी कर्मचा-यांनी उत्कृष्टरीत्या मतदान केंद्र चालविले. याबद्दल या मतदान केंद्रातील दिव्यांग कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.

००००

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...