महाडीबीटी
पोर्टल प्रणालीमध्ये ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी 10 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ
नांदेड दि. 6 :- भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतंर्गत अनु. जाती,
विजाभज,इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2018-2019 पासून
महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज भरुन अर्ज व आवश्यक कागदपत्रे संबंधित
महाविद्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
भारत सरकार शिष्यवृत्ती
व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेतंर्गत महाडीबीटी पोर्टल प्रणालीमध्ये
अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दिनांक 10 मार्च, 2019 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभागाकडून अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राबविण्यात येणाऱ्या विविध
शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांनी वरील मुदतीच्या आत ऑनलाईन अर्ज व आवश्यक कागदपत्रे
महाविद्यालयात सादर करावीत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment