Wednesday, March 6, 2019


काचबिंदू : एक दृष्टिक्षेप

12 मार्च हा जागतिक काचबिंदू दिन म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज भारतामध्ये अंधत्व येण्याचे प्रमुख कारणांपैकी काचबिंदू हा दुसऱ्या नंबरवर आहे. त्याआधी मोतीबिंदूचा क्रमांक एक अबाधित आहे.

 तर काचबिंदू म्हणजे तरी काय? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. जसा रक्तदाब {बीपी} हा   120/80 योग्य समजण्यात येतो. त्याचप्रमाणे डोळ्याच्या आतील दाब देखील २० मि.मी. पर्यंत योग्य समजला जातो. जर हा दाब त्यापेक्षा अधिक असला तर त्याला काचबिंदू म्हटले जाते.

       काचबिंदू मुळे डोळ्याच्या आतील दाब वाढल्यामुळे दृष्टी संवेदना वाहून नेणाऱ्या गँगलीआँन पेशींवर परिणाम होऊन उपचाराअभावी त्या मृत पावतात व कायमस्वरूपी नजर जाण्याचा धोका उत्पन्न होतो. आणि त्याचाच परिणाम म्हणून रुग्णांचा दृष्टी परीघ (field) कमी होऊ लागतो. एक वेळ अशी येते की सदर व्यक्ती समोरची वस्तू सोडून त्या आजूबाजूचा परिसर दिसेनासा होतो. यालाच (tubular vision) म्हणतात. म्हणजेच  नळीतून वा दुर्बिणीतून पाहिल्या सारखे दिसते. बाजूची वस्तू पाहण्यासाठी त्याला मान वळवावी लागते. म्हणूनच अशा व्यक्तीने वाहन (vehicle) चालविणे धोकादायक असते.

 एकदा काचबिंदू झाल्यावर रुग्ण उपचाराखाली असताना काही चाचण्या ह्या सातत्याने    (follow-up) करणे गरजेचे असते. त्यामध्ये नेत्रतज्ञा मार्फत डोळ्याचे सखोल परिक्षण करत असताना tonometry  (आतील दाब मोजमापन करणारे यंत्र),  fundoscopy (दृष्टीपटल व दृष्टीचेता तपासणी यंत्र), gonioscopy (काचबिंदूचा प्रकार तपासणारे माध्यम), topo-pacheymeter (बुबुळाची जाडी तपासणे), OCT (रेटीना तपासणी) इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो.

काचबिंदू हा चोरपावलाने येणारा डोळ्याच गंभीर आजार असून यामध्ये दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.

यामध्ये जोखीम कोणाला आहे, तर...ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. ज्याच्या घरी कोणाला तरी (Family History) कौटुंबिक इतिहास आई-वडील, भाऊ-बहीण, इत्यादींना काचबिंदू असणे. बैठे काम, व्यायामाचा अभाव, अनियंत्रित आहार, ताणतणाव (sedentary lifestyle, stress) रक्तदाबाचा आजार धूम्रपान

लक्षणे...चष्म्याचा नंबर सतत बदलणे .डोळे दुखणे.डोळ्यातून पाणी वाहणे, लाल होणे.डोळ्यासमोर रंगीत वर्तुळे दिसणे इत्यादी.

संभाव्य गंभीर धोका लक्षात घेऊन रुग्णांनी नियमित तपासणी केल्यास, शिल्लक असलेली नजर वाचवता येऊ शकते. त्यामध्ये औषधी (eye drops) च्या स्वरूपात, लेझरच्या पद्धतीने व शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार शक्य आहे.

      थोडक्यात नियमित तपासणी व प्रतिबंधात्मक उपचार पद्धती याचे अनुकरण केल्यास दृष्टी टिकवता येऊ शकते.

                                                                                           डॉ. शिरसीकर संतोष

                                                                                           जिल्हा अंधत्व दृष्टीक्षिणता कार्यक्र,

      नांदेड

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...