वृत्त क्रमांक 506
शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत
विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक
द्वितीय क्रमांकावर पाच
कार्यालय तर चार कार्यालयांना तृतीय क्रमांक प्राप्त
नांदेड, दि. 16 मे :- शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत छत्रपती संभाजीनगर विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाच कार्यालय असून चार कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल या सर्व कार्यालयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरीत तालुका स्तरीय शासकीय कार्यालयात नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर, तहसिलदार नांदेड, उपअधिक्षक भूमि अभिलेख नांदेड, उपअभियंता म.जी.प्रा. नांदेड, उपअभियंता पाणी पुरवठा भोकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी किनवट या सहा कार्यालयांचा यात समावेश आहे.
द्वितीय क्रमांक उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, पोलीस निरीक्षक भोकर, वन परिक्षेत्र अधिकारी माहूर, पशुधन विकास अधिकारी नांदेड, शहर उपविभाग 1 नांदेड उपअभियंता महावितरण या पाच कार्यालयांना मिळाला आहे.
तर तृतीय क्रमांक दुय्यम निबंधक
उमरी, तालुका वैद्यकिय अधिकारी मुदखेड, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा नांदेड, मुख्याधिकारी नगरपरिषद देगलूर या कार्यालयांना मिळाला
आहे.
00000
No comments:
Post a Comment