वृत्त क्र. 965
जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात मतदान जनजागृती
नांदेड दि. 21 ऑक्टोबर :- नांदेड येथील सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयात आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ स्वीपकक्षा मार्फत मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ. निरंजन कौर होत्या.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शकामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सामाजिकशास्त्र संकुल विभागाचे संचालक प्रा.डॉ. घनश्याम येळणे तसेच 087 दक्षिण नांदेड स्वीप कक्षातील सदस्य प्रा.डॉ. व्ही.एल.तरोडे, लेफ्टनंट प्रा.डॉ. के.वाय.इंगळे, प्रा.डॉ. डी.एम. बडूरे, राजेश कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, अजय आठवले व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. व्ही.एल.तरोडे यांनी केले. त्यांनी स्वीप कक्ष स्थापने मागची भूमिका व कक्षाच्या माध्यमातून पार पडल्या जाणाऱ्या जबाबदारी या विषयाची माहिती उपस्थितांना दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. घनश्याम येळणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाची लोकशाही शासन व्यवस्थेच्या यशस्वीतेसाठी असणारी उपयुक्तता व त्याचप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तींचा मतदान प्रक्रियेमध्ये असणारे योगदान हे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करीत असताना अनेक छोट्या छोट्या उदाहरणांचा आधार घेऊन लोकशाही शासन व्यवस्थेत असणारे मतदानाचे महत्त्व प्रतिपादित केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रा.डॉ. निरंजन कौर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृतीसाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करू व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील प्रा. डॉ. गोपाळ बडगिरे यांनी मांडले. तर शेवटच्या सत्रात बाळासाहेब कच्छवे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांकडून सामूहिक मतदानाची शपथ घेतली.
00000
No comments:
Post a Comment