Thursday, August 24, 2023
दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होणार कारवाई
दूध व दुग्धजन्य पदार्थात भेसळ केल्यास होणार कारवाई
नांदेड (जिमाका) दि. 24 :- दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाऱ्या भेसळीला पायबंद घालण्यासाठी जिल्ह्यात जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्यावतीने पथक निर्माण करुन जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थाची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी मोहिमेत दोषी आढळून येणाऱ्यांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व उत्पादक, विक्रेते व सहकारी, खाजगी दुग्ध प्रकल्प, दुग्धजन्य पदार्थ निर्माते, दुकानदार यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डॉ. एस.एस. बळवंतकर यांनी केले आहे.
जिल्ह्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये मोठया प्रमाणात भेसळ करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या उत्पादनामध्ये व मागणीमध्ये मोठया प्रमाणात तफावत निर्माण होवून जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थाचा कृत्रिम फुगवटा होत आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही. याशिवाय दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीमुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे नियुक्त केलेल्या पथकामार्फत जिल्ह्यात तपासणी मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
Subscribe to:
Post Comments (Atom)
महत्वाचे / संदर्भासाठी विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...
No comments:
Post a Comment