महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या
इयत्ता पाचवी व आठवीसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी
नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक स्तर इयत्ता 5 वी व उच्च प्राथमिक स्तर इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणीसाठी येत्या 15 एप्रिल 2022 पर्यंत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास
मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा
तपशील पुढील प्रमाणे आहे. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन
स्विकारण्यासाठी शुक्रवार 1 ते 15 एप्रिल 2022 च्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर ऑनलाईन
नावनोंदणी अर्ज सोमवार 4 ते 18 एप्रिल 2022 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ
कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा
करावे लागतील. शुक्रवार 22 एप्रिल 2022 रोजी संपर्क केंद्र शाळांनी
विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी
विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी
8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
000000
No comments:
Post a Comment