Saturday, September 5, 2020

आदिवासी विद्यार्थ्यांच्या एकलव्य स्कूलची

ऑनलाईन प्रवेश परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द   

मागील सत्राच्या गुणावर आधारित होईल निवड

-         प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

नांदेड (जिमाका) दि. 4 :- आदिवासी विद्यार्थ्यांची एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कूल मध्ये प्रवेशासाठी होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोना प्रादुर्भावाने रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची आता मागील सत्रातील गुणांच्या आधारे निवड केली जाईल. नांदेड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य शाळेतील मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 5 वी ते 9 वीतील गुण लिंकमध्ये 15 सप्टेंबर 2020 पर्यंत भरावेत, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार (भाप्रसे) यांनी केले आहे.

एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय व अनुदानीत आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील पाचवी ते नववीमध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कुलची प्रवेश परीक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. 

ही परीक्षा ऑनलाईन होणार होती परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प किनवट यांच्या कार्यक्षेत्रात नांदेड जिल्हातील सर्व शासकीय व आनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेत सन 2019-20 या शैक्षणिक वर्षामधील इयत्ता 5 वी ते 9 मध्ये शिकत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. या विद्यार्थ्यांच्या मागील सत्राच्या गुणाच्या आधारे आता विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. 

सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे / शाळेचे मुख्याध्यापकांनी गुण प्राप्त करुन घेऊन लिंकमध्ये मंगळवार 15 सप्टेबर 2020 पर्यत भरावयाचे आहेत, असे किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कळविले आहे.

 इयत्ता 6 व्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेचे अर्ज भरलेले आहेतत्यांनी आता 5 व्या वर्गातील प्रथम सत्रातील गुण भरण्याचे निर्देश शासनाकडुन दिले आहेत. हाच निकष इ. 7 वी ते 9 वी च्या रिक्त जागेवेरील प्रवेशाबाबत लागु करण्यात आलेला आहे. मागील सत्रातील एकंदर 900 गुणापैकी विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवले त्याआधारे निवड यादी जाहिर केली जाणार आहे. मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांच्या गुणाच्या  ऐवजी श्रेणी भरलेली स्वीकृत केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. विद्यार्थ्याच्या अर्ज भरतेवेळी आवेदन पत्रामधील दिलेला संपर्क / मोबाईल नंबर आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची जन्म तारीख आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मागील इयतेच्या प्रथम सत्राच्या गुणपत्रीकेची प्रत आवश्यक आहे. (स्कॅन केलेली गुणपत्रीकेची प्रत png.jpeg.jpg.pdf स्वरुपात असावी) शाळेतील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरलेले असतील तर प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती स्वंतत्र भरावी तसेच गुणपत्र स्वतंत्र अपलोड करावी.

 आवेदन पत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकानी विद्यार्थ्यांचे गुण mtpss.org.in या लिंकवर भरायची आहे. त्याकरीता मुख्याध्यापक यांनी संबधित विद्यार्थ्यांचे प्रथमसत्राचे गुण 900 पैकी नोंदवायचे आहे. (मराठी, हिन्दी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र, कला क्रिडा व कार्यानुभव असे एकुण 9 विषय) वर्ग 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या प्रगती पुस्तकामध्ये श्रेणी देण्यात येते. त्यामुळे सर्व संबधित विद्यार्थ्यांचे, संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी गुण प्राप्त करुन घेऊन लिंकमध्ये मंगळवार 15 सप्टेबर 2020 पर्यत भरावयचे आहेत, असेही आवाहन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

00000 


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...