वृत्त क्र. 584
व्यवसायकर दात्यांना विवरणपत्रके
भरण्यास 31 जुलैची मुदत
नांदेड (जिमाका) दि. 29 :- व्यवसायकर
अधिनियम 1975 अंतर्गत नोंदीत
व्यवसायकर दात्यांना देय
असलेली सर्व विवरणपत्रके 31 जुलै
2020 च्या
आत भरण्याची मुदत दिली आहे. राज्य व्यवसायकर विभागाने 22 जून
रोजी निर्गमीत केलेल्या अधिसुचनेनुसार 30 जून पर्यंत
प्रलंबीत असलेले सर्व मासीक, वार्षीक विवरणपत्र भरताना
लागणारा विलंब शुल्क माफ केला आहे.
व्यवसायकर दात्यांनी या संधीचा
लाभ घेऊन
विवरणपत्रके
भरण्यास अडचण असल्यास व्यवसायकर
अधिकारी, जीएसटी भवन रेल्वेस्टशन समोर, नांदेड या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर क्षेत्र नागपूरचे राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर) व्ही. डी.
कामठेवाड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment