पीक
विमा उतरवण्याचे आवाहन
नांदेड,
दि.
13
:- राज्यात प्रधानमंत्री पिक विमा
योजना खरीप हंगाम
2019 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना
पिक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 24 जुलै 2019 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा
जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड
यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना
अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असुन, बिगर कर्जदार
शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे.
खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के व कापसासाठी 5 टक्के ठेवण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत जोखीम स्तर सर्व पिकांसाठी
70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी
नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट,
चक्रीवादळ, पुर, दुष्काळ,
पावसातील खंड, किड व रोग ईत्यादी बाबीमुळे पिकांच्या
उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले
आहे. नांदेड जिल्हयातील भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे.
या
योजने अंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.
पीक
|
विमा संरक्षीत रक्कम रु./हेक्टर
|
शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु)
|
भात
|
43500/-
|
870/-
|
ख.ज्वार
|
24500/-
|
490/-
|
तुर
|
31500/-
|
630/-
|
मुग
|
19000/-
|
380/-
|
उडीद
|
19000/-
|
380/-
|
सोयाबीन
|
43000/-
|
860/-
|
तीळ
|
23100/-
|
462/-
|
कापुस
|
43000/-
|
2150/-
|
नांदेड जिल्हयात खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री
पिक विमा योजना खरीप-2019 लागु करण्याबाबत शासनाने मान्यता दिली
आहे. बँकेत पिक विमा भरण्याची अंतिम तारीख कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना पिक विमा
उतरवण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2019 ही
आहे. जिल्हयात खरीप हंगाम 2019 मध्ये सदरची योजना एग्रीकल्चर
इन्शुरंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात
येणार आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000
No comments:
Post a Comment