Monday, October 29, 2018


उपेक्षित व मुलांकडून देखभाल न होणाऱ्या
ज्येष्ठ नागरिकांना पिठासीन अधिकाऱ्यांकडे दाद मागता येईल
नांदेड दि. 29 :- उपेक्षित व मुलांकडून देखभाल न होणाऱ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना अधिनियमाद्वारे त्यांचे कार्यक्षेत्रातील पिठासीन अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.  
भारत सरकारने वृद्धांची उपेक्षा टाळण्यासाठी, त्यांची काळजी व देखभाल घेण्यास मुलांवर कायदेशीर दायित्व व जबाबदारी टाकण्यासाठी आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चारितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 व 2010 अधिनियमीत केला आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील पिठासीन अधिकारी म्हणून अधिसूचित केले आहे.
पिठासीन अधिकारी यांच्या कार्यक्षेत्राचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. नांदेड उपविभागीय अधिकारी - नांदेड व अर्धापूर तालुका (संपर्क क्र. 02462-230966). कंधार उपविभागीय अधिकारी- कंधार व लोहा तालुका (संपर्क क्र. 02466-223051). देगलूर उपविभागीय अधिकारी - देगलूर व मुखेड तालुका (02463-255034). बिलोली उपविभागीय अधिकारी- बिलोली व नायगाव तालुका (02465-223123). धर्माबाद उपविभागीय अधिकारी- धर्माबाद  व उमरी तालुका (02465-244279). भोकर उपविभागीय अधिकारी - भोकर व मुदखेड तालुका (02467-223884). हदगाव उपविभागीय अधिकारी - हदगाव व हिमायतनगर तालुका (02468-222099). किनवट उपविभागीय अधिकारी- किनवट व माहूर तालुका (02469-222228). या अधिनियमांतर्गत संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्रासाठी जिल्हाधिकारी हे अपिलीय प्राधिकारी आहेत, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...