Monday, May 21, 2018


लोकराज्य विशेषांकाचे
पालकमंत्री रामदास कदम यांचे हस्ते प्रकाशन
नांदेड दि. 21 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोकराज्य मे 2018 चा विशेषांक "4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाची सर्वांची साथ : सर्वांचा विकास" या विषयावर असून राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन मिनी सह्याद्री शासकीय विश्रागृह येथे करण्यात आले.
यावेळी आमदार हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, मनपा आयुक्त लहुराज माळी, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता व्ही. टी. बडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर, पत्रकार विजय जोशी, विश्वनाथ देशमुख, प्रल्हाद लोहेकर, मुक्तेश्वर धोंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या चार वर्षपूर्ती निमित्त "लोकराज्य"चा मे 2018 चा विशेषांक ‘4 वर्षे भारताच्या नवनिर्माणाचीसर्वांची साथ सर्वांचा विकास या विषयावर तयार करण्यात आला आहे. या विशेषांकात गत चार वर्षात केंद्र सरकारने आणि विशेषत: महाराष्ट्रातील मंत्री महोदयांनी जी कामगिरी केली आहे, त्याचा विस्तृत लेखा-जोखा मांडण्यात आला आहे.
या विशेषांकात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वे मंत्री पीयुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार विनय सहस्त्रबुध्दे, खासदार मिनाक्षी लेखी, परराष्ट्र मंत्रालयातील ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार टेकचंद सोनावणे, पत्रकार विकास झाडे, मंगेश वैशंपायन, अमृता कदम, राहुल परचा, निवेदिता मदाने-वैशंपायन, नरेंद्र जोशी, संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्रकुमार विसपुते, उपसंचालक दयानंद कांबळे, वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर, उपसंपादक रितेश भुयार, हर्षल आकुडे, किरण पवार यांचे लेख आहेत. हा विशेषांक संग्राह्य असून वृत्तपत्र विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयाचे छायाचित्रकार विजय होकर्णे, विवेक डावरे, अलका पाटील, काशिनाथ आरेवार, महमंद युसूफ यांचीही उपस्थिती होती.
0000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...