Friday, December 15, 2017

माळेगाव यात्रेत महिला बचतगटाच्या
वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री
नांदेड दि. 15 :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तुंचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन वस्त्रोद्योग व पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य विकास राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. श्रीक्षेत्र खंडोबा माळेगाव यात्रेत होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी कळविले आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण राहणार असून जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच खा. राजीव सावत, खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. अमर राजूरकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. डी. पी. सावंत, आ. प्रदीप जाधव, आ. वसंत चव्हाण, आ. सुभाष साबणे, आ. हेमंत पाटील, आ. अमिता चव्हाण, आ. नागेश पाटील आष्टीकर, आ. डॉ. तुषार राठोड, विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, आरोग्य व शिक्षण समिती सभापती माधव मिसाळे, कृषि समिती सभापती दत्तात्रय रेड्डी, समाज कल्याण सभापती शिलाताई निखाते, महिला व बालकल्याण समिती सभापती मधुमती कुंटुरकर, लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश उमरेकर यांची उपस्थिती राहणार आहे, असेही प्रकल्प संचालक नईम कुरेशी यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...