Tuesday, March 14, 2017

अनुसूचित जाती बचतगट मिनी ट्रॅक्टर
योजनेत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड दि. 14 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटाना 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 आश्वशक्ती मिनी ट्रॅक्टर त्याची उपसाधने यांच्या खरेदीच्या रुपये 3 लाख 50 हजाराच्या मर्यादेत पुरवठा करण्याची योजना कार्यान्वित झाली आहे. योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्यासाठी मंगळवार 21 मार्च 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावे,  असे आवाहन नांदेड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी. एन. वीर यांनी केले आहे.
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटातील सदस्य महाराष्ट्राचे रहिवाशी असावे. एकूण सदस्यांपैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जातीचे असणे आवश्यक आहे. तसेच अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. आदी अटी पूर्ण करणाऱ्या स्वयंसहाय्यता बचतगटाना मिनी ट्रॅक्टर व इतर साहित्यासाठी शासनाकडून 3 लाख 15 हजार पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नमस्कार चौक, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...