Saturday, October 8, 2016

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
269 प्रकरणे निकाली, 1 कोटी 9 लाख रुपये वसूल
नांदेड , दि. 8 :- जिल्हा न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यावतीने जिल्हयात आज राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले. यात जिल्ह्यात तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या 927 प्रकरणांपैकी 269 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये तडजोड व दंड स्वरूपात  1 कोटी 9 लाख 77 हजार 372 रुपये वसूल करण्यात आले.   
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, ट्रॅफिक, पिट्टी प्रकरणे तसेच मुनिसिपल प्रकरणांचे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित केले होते. या लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता बारणे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. आर. कुरेशी यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाले.
            नांदेड जिल्हा न्यायालयात एकूण 5 पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश एच. आर. वाघमारे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. सचदेव, सह दिवाणी न्यायाधीश एस. आर. नरवाडे, दिवाणी न्यायाधीश विश्वंभरण सरिता, एस. एम. जोशी यांनी काम पाहिले. तसेच यांना पॅनल सदस्य म्हणून अॅड. विजय गोणारकर, अॅड. एच. आर. जाधव, अॅड. नईमखान पठाण, अॅड. आर. एस. कानोटे, अॅड. सी. आर. भुयारे, अॅड. साबळे, अॅड. प्रविण अयाचित, अॅड. एम. के. हुके, अॅड. पी. एच. रतन, अॅड. मो. शाहेद मो. इब्राहिम यांचे सहकार्य लाभले.
या लोकन्यायालयात जिल्हा न्यायालयातील सर्व न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक एम. के. आवटे तसेच विधीज्ञ, पक्षकार बांधव आणि जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. तुप्तेवार, अधिक्षक कबिर सिध्दीकी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. आर. खरात, पॅनलवरील न्यायालयीन कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...