वृत्त क्रमांक 934
आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन
नांदेड दि. 4 सप्टेंबर :- हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनसीसीएफ च्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मूग,उडीद, सोयाबीन व तुर ) खरेदी करण्यात येणार आहे. आधारभूत दराने खरेदी करण्याकरीता ई-पिक पाहणी असलेला 7/12 उतारा आवश्यक आहे. तसेच सदर खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाईन प्रणालीव्दारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्याकरीता महाराष्ट्र्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment