वृत्त क्र. 152
नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला
नांदेड दि. 6 फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झालेत. पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी , परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी पदे त्यांनी भूषविली आहेत.
मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे. अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.
0000
No comments:
Post a Comment