वृत्त क्र. 890
नांदेड जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्यासह
मानवनिर्मित वस्तू उडविण्यास प्रतिबंध
नांदेड दि. 2 ऑक्टोंबर :- नांदेड जिल्ह्यात व शहरात तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसरात ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्यावर 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी बंदी घालण्यात आली आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी यांनी हे आदेश निर्गमीत केले आहेत.
हा आदेश 4 ऑक्टोबरचे 00.00 ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी मध्यरात्री पर्यंतच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात व शहरात तसेच श्री गुरुगोविंदसिंहजी विमानतळ परिसर, गुरुद्वारा परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) नुसार ड्रोन कॅमेरा, ड्रोन सदृश्य वस्तु व हवेत उडविल्या जाणाऱ्या मानवनिर्मित वस्तू उडविण्याकरीता या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे. संबंधीतावर नोटीस बजावून त्यांचे म्हणने ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार एकतर्फी आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
00000
No comments:
Post a Comment