वृत्त
गदिमांच्या गितातील भाव-भावनांना
ती पहाट जेंव्हा रसिकांना खिळवून ठेवते !
· गोदाघाट येथे नांदेडच्या रसिकांनी
अनुभवला गदिमांचा गीतयात्री प्रवास
नांदेड (जिमाका) दि. 16 :- ज्या घरात ग. दि. माडगूळकर यांची गीते पोहोचली नाहीत असे एकही मराठी माणसाचे घर सापडणे अवघड. कित्येक पिढ्यांच्या मनावर गदिमांची गीते आजही तेवढ्याच तजलतेने भुरळ घालतात. तुझ्या कांतीसग, नाचुनी अति मी थकले, निजरुप दाखवा हो, गंगा आली रे अंगणी, झाला महार पंढरीनाथ, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही गीते गदिमांनी दिलेली तशी मोठी शिदोरीच आहे. या गाण्यांची शिदोरी दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून नांदेड येथील कलावंत ॲड गजानन पिंपरखेडे व पत्रकार विजय जोशी यांनी रसिकांच्या भेटीला दिली.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड व नागरी सांस्कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळ पहाट या कार्यक्रमात दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड येथील रसिकांना “गदिमा एक गीत यात्री” या कार्यक्रमातून सुरेख भावविश्वाची अनुभूती घेता आली.
प्रख्यात गायक प्रा.अशोक ठावरे, मुंबईच्या सौ.आसावरी जोशी बोधनकर, पुण्याच्या वर्धिनी जोशी हयातनगरकर, गायक प्रणव पडोळे, मेघा गायकवाड, डॉ.कल्याणी जोशी यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक दर्जेदार रचनामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. आसावरी बोधनकर हिने कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या कांतीसग या गिताने केली. तिनेच गायलेल्या नाच नाचूनी अति मी थकले, कुणी तरी बोलवा दाजीबाला, बुगडी माझी सांडली गं, आई मला नेसव शालू नवा, असेल कोठे रुतला काटा या गिताने रसिक,प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. वर्धिनी जोशी हयातनगरकर हिने सादर केलेल्या आज कुणी तरी यावे, दिवसा मागून दिवस चालले, ओटीत घातली मुलगी विहिनीबाई या गितांनाही रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रणव पडोळे यांनी निजरुप दाखवा हो, पोटा पुरता पसा पाहिजे, हटातटाने पटा जरा, गंगा अली रे अंगणी या गीतानीही रसिक,प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. डॉ.कल्याणी जोशी हिने सादर केलेल्या कौसल्येचा राम बाई एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, तोडिता फुले मी सहज पाहिला हि गिते सादर करुन रसिकांच्या मनातील गाणी सादर केली. प्रख्यात गायक प्रा.अशोक ठावरे यांनी उठ पंढरीच्या राजा, कानडा राजा पंढरीचा, फिरत्या चाकावरती देसी आणि विठ्ठलाच्या पायी थरारली विट ही रसिकाच्या मनातील गाणी अगदी तंत्रशुध्द पध्दतीने सादर करुन रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
निर्माते विजय जोशी यांनी घन घन माला नभी दाटल्या, झाला महार पंढरीनाथ ही गिते सादर केली. उठ पंढरीच्या राजा हे गीत अशोक ठावरे यांना साथसंगत करताना रसिकांना भक्तिभावात तल्लीन केले. आसावरी व प्रा.अशोक ठावरे यांनी सादर केलेली नाही खर्चिली कवडी दमडी, कृष्ण तुझा बोले वैâसा ही व्दंद गिते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. संकल्पना व निवेदन असलेल्या अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी गदिमांचा जीवनपट उलगडून दाखविताना अनेक उदाहरणे व त्यांच्या जीवनशैलीची यथार्थ वर्णन आपल्या निवेदनात आणून रसिकांना त्यांच्या जीवनशैलीचा उलगडा केला.
या कार्यक्रमाला संगीतसाथ सिध्दोधन कदम, राजू जगधने, स्वप्नील धुळे, रवीकुमार भद्रे, गौतम डावरे, आदित्य डावरे यांनी केली. दिवाळी पहाटच्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनातील गाणी त्यांना ऐकावयास मिळाल्याने रसिकांचा उदंड प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन प्रमोद देशपांडे व उमाकांत जोशी यांचे होते. तर व्यवस्थापन प्रा.विजय बंडेवार यांचे होते.
0000
No comments:
Post a Comment