गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ
- नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 28 :- डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात आज 28 सप्टेंबर 2023 रोजी 100 टक्के पाणीसाठा झाला असून पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी चालू आहे. त्यामुळे बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे आज सायं. 5 वा. बंधाऱ्याचे एक द्वार उघडून 471 क्युमेक्स (16 हजार 632 cuscc) या वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पाण्याचा वेग सुध्दा वाढणार आहे. आज गणेश विसर्जन असल्यामुळे नदीकाठावरील घाटावर विसर्जनासाठी मोठया प्रमाणात गणेश भक्त आलेले असतात. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होवू नये यासाठी सतर्कता बाळगावी तसेच विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावातील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य इतर कोणत्याही मालमत्तेची हानी होणार नाही यांची काळजी नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
00000
No comments:
Post a Comment