Monday, September 12, 2022

 आझादी का अमृत महोत्सवानिमित्त

शहीद सैन्य अधिकारी परिवाराचा सन्मान 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- भारताच्या अखंडतेसाठी व भारताच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य पार पाडतांना शहीद झालेल्या परिवारांचा यथोचित गुणगौरव ही तरुणांसाठी प्रेरणादायी बाब आहे. भारतीयांच्या मनामध्ये भारतीय सैन्याबद्दल नितांत आदर आहे. तो आदर वृद्धींगत करण्यासाठी केलेला हा समारोह अतिशय स्तुत्य आहे असे मनोगत माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केले. 

आझादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त येथील सायन्स कॉलेजच्या भव्य प्रांगणात 52 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेड यांच्यावतीने भारतीय सैन्यात कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शहिदांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमांडिंग अधिकारी कर्नल यम रंगराव तर मुख्य अतिथी म्हणून माजी खासदार तथा नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, प्रशांत दिग्रसकर, जिल्हा शिक्षण अधिकारी सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. यु. गवई व उप शिक्षणाधिकारी दिलीप भाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहीद वीरांना गार्ड ऑफ ऑनरद्वारा सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित मुख्य अतिथी यांच्यावतीने पुष्प अर्पण करून शहिदांना अभिवादन केले. 

नांदेड जिल्ह्यातून शहीद झालेल्या अधिकारी व सैनिकांचा सन्मानपत्र घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक कलावती बोडके, धोंडीबा जोंधळे, अरुणाताई ज्ञानोबा तरके, ज्योती प्रफुल गोवंदे, उषा नारायण रणपुरे, शीतल संभाजी कदम , गंगाबाई मारोतराव मोकलीकर, मधुमालती दिलीप केंद्रे, कमलाबाई नारायण लुंगारे, डॉ.प्रतिभा मनोज धायडे, मरीबा गायकवाड हे उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातून शहीद परिवाराचे सदस्य बेबीताई लक्ष्मण कीर्तने, शिवनंदा नामदेव इंगोले रणवीर लक्ष्मी भिकाजी तर परभणी जिल्ह्यातून उपस्थित परिजन यामध्ये अंजना बालाजी अंभोरे, सुनिता सूर्यकांत मुस्तापुरे, अर्चना गणेश चित्रावार, श्रद्धा मुंजाभाऊ तलभारे, मथुराबाई महादू शिरसागर, मनकर्णिक जनार्धन मुंडे, अनुराधा गणेश शहाणे, सुनिता सुधाकर गोडबोले, नामदेवराव रणखांबे , कविताबाई सागर गायकवाड हे शहिदांचे परिजन उपस्थित होते. 

या समारोहात शहिदांना सन्मान देण्यासाठी सन्मान गार्ड आयोजित करण्यात आला. या गार्डनचे नेतृत्व हवलदार जगतराम , हवालदार जसबीर, यांनी केले या गार्ड मध्ये. जसबीर,हवालदार यश, हवालदार संजय घोष ,हवलदार सिद्धाप्पा, हवालदार योगेश, हवलदार नरेंद्र, हवालदार अरविंद यांनी सहभाग घेतला. 

शहिदो को शत शत नमन हा समारोह आयोजित करताना कर्नल यम रंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली बटालियनचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल वेत्रिवेलू, मेजर पंढरीनाथ घुगे ,सुभेदार मेजर ललित प्रसाद, सुभेदार वैजनाथ चौगुले, ट्रेनिंग जेसिओ सुभेदार गोपाल सिंह, बी एच एम सुनील कुमार, हवालदार संजय कुमार ,हवलदार सुरज कुमार, यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रीती हंडा हंडेवार शुभांगी मलशेट्टी, नागेश्री हंडेवार ,कोमल पवार, संदीप सूर्यवंशी व तेजस कांबळे, पांचाळ व्यंकटेश गवळी विठ्ठल, राजू पवार आदी तसेच छात्र सैनिक, छात्र आधिकरी, यांनी परिश्रम घेतले. वैजनाथ चौगुले, ट्रेनिंग जेसिओ सुभेदार गोपाल सिंह, बी एच एम सुनील कुमार, हवालदार संजय कुमार ,हवलदार सुरज कुमार, यांच्यासह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी प्रीती हंडा हंडेवार शुभांगी मलशेट्टी, नागेश्री हंडेवार ,कोमल पवार, संदीप सूर्यवंशी व तेजस कांबळे, पांचाळ व्यंकटेश गवळी विठ्ठल, राजू पवार , शेख अन्सारी आदी तसेच छात्र सैनिक, छात्र आधिकरी, मेजर सिद्धेवाड,गावंडे, एनसीसी अधिकारी कदम, केंद्रे, ढवळे, भोसीकर,गाडेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्नल यम रंगाराव यांनी केले तर संचालन व आभार मेजर पंढरीनाथ घुगे यांनी केले.

0000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...