नांदेड जिल्ह्यात 19 व्यक्ती कोरोना बाधित
तर 33 कोरोना बाधित झाले बरे
नांदेड (जिमाका) दि. 14 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 818 अहवालापैकी 19 अहवा
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 7, अर्धापूर 1, बिलोली 1, हदगाव 1, माहूर 1, मुदखेड 1, हिंगोली 1, बीड 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 5 असे एकुण 19 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 25, खाजगी रुग्णालय 3 असे एकुण 33 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 14, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 50, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 73, खाजगी रुग्णालय 10 असे एकुण 147 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 63 हजार 543
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 44 हजार 216
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 559
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 724
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.23 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-26
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-147
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5.
कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment