Saturday, August 22, 2020

 

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या अतिरिक्त मार्गदर्शक सुचना

 

नांदेड (जिमाका), दि. 22 :- जिल्ह्यातील गणेशोत्सव सण साजरा होत असतांना या काळात लोकांनी अधिकाधिक स्वत:ची सुरक्षितता घेऊन कोरोनाच्या सार्वत्रिक प्रसाराला रोखण्यासाठी जबाबदारीने सर्व शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. याबाबत शासनाने वेळोवेळी सुचना व निर्देश असणारे आदेश निर्गमीत केले आहेत. दिनांक 8 ऑगस्ट अन्वये निर्गमीत करण्यात आलेल्या सुचनांमध्ये आता पुढील सुचना या समाविष्ट करण्यात येत आहेत. 

जिल्ह्यातील सर्व घरगुती व सार्वजनिक गणपतीचे विसर्जन हे शक्य तो स्थानिक स्वराज्य संस्थांनी जसे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत इत्यादींनी गणपती विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव / हौदामध्ये विसर्जनासाठी आपापल्या गणेशमुर्ती या संकलन केंद्राकडे सुपुर्द / जमा कराव्यात. याचबरोबर सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व दहा वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने व जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश / निर्देश याचे पालन करणे बंधनकारक राहिल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...