Thursday, May 21, 2020


सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य घ्‍यावे ;
प्रधानमंत्री गरीब कल्‍या अन्‍न योजनेतून
तूरदाळ, चना दाळीचे मोफत वितरण सुरु
नांदेड, दि. 21 :-  प्रधानमंत्री गरीब कल्‍याण अन्‍न योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील पात्र लाभार्थ्‍यांना एप्रील, मे व जून 2020 साठी अन्‍नधान्‍याचे दिलेल्‍या नियमित नियतनानंतर अंत्‍योदय  आणि प्राधान्‍य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह 1 किलो डाळ या परिमानात (तूरडाळ व चनाडाळ या दोन्‍हीपैकी एक डाळ 1 किलो या कमाल मर्यादेत) पॅाश मशीनद्वारे मोफत वाटप होणार आहे. शिधापत्रिकाधारकांनी स्वस्‍तधान्‍य दुकानात गर्दी न करता सोशल डिस्‍टन्‍ससिंगचे पालन करुन धान्‍य प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्‍हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांनी केले आहे.  
नांदेड जिल्‍हयातील 16 तालुक्यांना अंत्‍योदय अन्‍न योजनेतील  80 हजार 124 शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्‍य कुटुंब येाजनेतील 4 लाख 10 हजार 201 शिधापत्रिकाधारकांना या येाजनेंतर्गत मोफत डाळीचे वितरण करण्यासाठी प्रतिमाह 528 मे. टन डाळ मंजुर करण्‍यात आल आहे. मोफत डाळ एपीएल शेतकरी व एपीएल केशरी लाभार्थ्यांना मिळणार नाही. याबाबत संबंधित तहसिलदार तसेच स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांना नमूद जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्‍यांना डाळ वाटप करण्‍याबाबत सूचना देण्‍यात ली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्‍यातील विशिष्‍ट आपत्‍कालीन परिस्थिती विचारात घेता  लक्ष्‍य निर्धारित सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतील लाभार्थ्‍यांना  एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्‍याचे नियमित अन्‍नधान्‍याचे वाटप झाल्‍यानंतर त्‍या-त्‍या महिन्‍यात  या दाळीचे मोफत वितरण सुरु होणार आहे. सध्‍या नांदेड जिल्‍हयातील नायगाव, मुदखेड तालुक्‍यात मोफत डाळीचे वितरण सुरु झाले असुन उर्वरित तालुक्‍यात चालु आठवड्यामध्‍ये मोफत डाळीचे वितरण सुरु होणार आहे.
एप्रील 2020 साठीच्‍या एका महिन्‍याची डाळ वाटप मे 2020 महिन्‍यामध्‍ये करण्‍यात येणार असून मे व जून 2020 च्‍या डाळीच्या वाटपाबाबत नंतर स्‍वतंत्ररित्‍या कळविण्‍यात येल.  नांदेड जिल्‍हयात एकूण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदार असुन या सर्व रास्‍त भाव दुकानदारांना सर्व योजनेचे मे 2020 साठी 27 हजार 226 मेट्रीक टन धान्‍य सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेतर्गत लाभार्थ्‍यांना वितरणासाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले आहे .
        नांदेड जिल्‍हयातील बुधवार 20 मे 2020 पर्यंत  मे 2020 चे नियमीत अन्‍न धान्‍य वितरण 1 हजार 993 रास्‍त भाव दुकानदाराकडुन अंत्‍योदय योजने 2 हजार 661, प्रा.कू.योजनेचे 8 हजार 182, एपीएल केशरी (शेतकरी) योजनेचे 1 हजार 821 आणि एपीएल केशरी (एनपीएच) 606 असे एकुण  13 हजार 270 मेट्रीक टन सर्व योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नियमित धान्‍य वाटप झाले असून प्रधानमंत्री गरीब कल्‍याण योजनेतर्गत अंत्‍योदय अन्‍न योजना व प्राधान्‍य कुटुंब योजनेच्‍या लाभार्थ्‍यांना 4 हजार 592 मेट्रीक टन मोफत तांदुळ वितरण करण्‍यात आला आहे.
राज्य अन्‍न व नागरी पुरवठा ग्राहक सरक्षण विभागाचा शासन निर्णय 9 एप्रिल 2020 मध्‍ये शासनाने असे निर्देश दिले आहेत की, नोव्‍हेल कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या व एपीएल (केशरी) शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या तसेच ज्‍या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदी संगणकीय प्रणालीवर झाल्या नसतील अथवा त्या शिधापत्रिकांचे आधार सीडींग झाले नसेल अशा शिधापत्रिकाधारकांना एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना ज्‍यांचे वार्षीक कौटुंबीक उत्‍पन्‍न 1 लाखाच्‍या आत आहे. अशा लाभार्थ्‍यांसाठी  माहे मे व जून 2020 या 2 महिन्यांच्‍या कालावधीसाठी प्रति महिना प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहु  (8 रु प्रति किलो प्रमाणे ), व तांदुळ 2 किलो ( 12 रु प्रति किलो प्रमाणे)  दराने अन्‍नधान्‍याचा लाभ देण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्‍हाधिकारी नांदेड व जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...