Thursday, January 23, 2020


केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड, दि. 23 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापुर या तालुक्यात केळी पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात येत आहे.
केळीच्या प्लॉट  स्वच्छ तणविरहीत ठेवावा. तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थीत करावा, पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी. केळीच्या पानावरील ठिपके आढळल्यास तो भाग काढुन टाकावा. बागेच्या बाहेर  नेऊन नष्ट  करावा, असे आवाहन आर. टी. सुखदेव उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक 839   शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल सुरू   ·    समाज कल्याण कार्यालयामार्फत महाविद्यालय प्राचार्यांना आ...