प्रजासत्ताक दिनी
ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी
भारताच्या संविधानामधील
उद्देशिकाचे सामुहिक वाचन
शासन शुद्धीपत्रकानुसार वाचन
करण्याचे निर्देश
नांदेड दि. 24 :- प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी ध्वजारोहण
कार्यक्रमापूर्वी सर्व विभागांनी भारताच्या संविधानामधील उद्देशिका / Preamble यांचे
सामुहिक वाचन करण्याबाबत ग्रामविकास विभागाने शासन शुद्धीपत्रक 24 जानेवारी रोजी निर्गमीत
केले आहे. त्यानुसार परिच्छेद क्र. 2 मध्ये शुद्धीपत्रकानुसार वाचन करण्याचे
निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी विभाग प्रमुखांना दिले आहेत.
याबाबत ग्रामविकास
विभागाने 22 जानेवारी 2020 रोजी शासन परिपत्रकामधील परिच्छेद क्र. 2 मध्ये “त्यामुळे दिनांक 26 जानेवारी 2020 पासून ग्रामीण स्थानिक
स्वराज संस्थांमध्ये (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) दरवर्षी होणाऱ्या
ध्वजारोहन कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) / Preamble
याचे सामुहिक वाचन करण्यात यावे” असे वाचण्यात
यावे 24 जानेवारी 2020 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकात नमुद केले आहे.
00000
No comments:
Post a Comment