Monday, August 12, 2019


आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त रॅली संपन्न  
नांदेड, दि. 12 :- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित येथील जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागांतर्गत श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय अंतर्गत आज रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. पी. कदम, रा.से.यो.संचालक डॉ. शिवराज बोकडे, सायन्स कॉलजचे एनएसएस प्रमुख डॉ. डी. डी. पवार, डॉ. अरूणा शुक्ल, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदिप अंकुशे यांचे हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन सुरूवात करण्यात आली.
रॅलीत नर्सिंग कॉलेज प्राचार्य एस. ए. गायकवाड, एनएसएस प्रमुख प्रा. दिलीप काठोडे, प्रा. डॉ. व्यंकटी पावडे, प्रा. डॉ. एस. बी. शिंदे, प्रा. डॉ. व्ही. व्ही. मोरे , प्रा. शिवाजी कांबळे, डॉ. बी. आर. भोसले, डॉ. एच. एस. पतंगे, डॉ. एम. बी. वाघ, डॉ. पी. ए. कदम, प्रा. बी. बी. शिंदे, डॉ. एस. एल. मुनेश्वर, प्रा.विजु जाधव, डॉ.जयवर्धन बलखंडे तसेच विविध विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, आरोग्य कर्मचारी, आयसीटीसी विभागाचे कर्मचारी यांचा सहभाग होता.  
रॅली येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथुन निघून गांधी पुतळा मार्गे- हनुमानपेठ-वजिराबाद-मुथाचौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नंतर श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय येथे सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदिप अंकुशे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास अमिलकंठवार, अजय मवाडे, हषवर्धन पंडागळे, सौ. दिपाली पेटकर, श्री. कलंबरे, सौ. उषा वानखेडे यांनी परीश्रम घेतले.
0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...