Tuesday, October 23, 2018


ज्येष्ठ नागरीकांसाठी दर शुक्रवारी
मोफत विधी सेवा सहाय्य   
नांदेड दि. 23 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य पुरविण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे जेष्ठ नागरीकांसाठी दर शुक्रवारी मोफत विधी सेवा सहाय्य उपलब्ध करुदेण्यात येणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून समिती डॉ. हंसराज वैद्य,  अशोक तेलकर तसेच विधीज्ञ व्ही. डी. पाटनुरकर हे सदस्य काम पाहणार आहेत.
या समितीचे कामकाज आठवडयातील प्रत्येक शुक्रवारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय परिसर नांदेड येथे दुपारी 2 ते 3  यावेळेत चालणार आहे.  या समितीत जेष्ठ नागरीकांची प्रकरणे मिटविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या न्यायालयीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी नमुद ठिकाणी नियोजीत दिवशी वेळेत उपस्थित राहुन आपल्या न्यायालयीन समस्या मिटविण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे. 
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक   847   इस्राईलमध्ये  5  हजार रोजगाराच्या   संधी   नांदेड दि.  13  ऑगस्ट : -  जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी परदेशात रोजगार...