विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या
वाहनांनी तपासणी करुन घ्यावी
- पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना
नांदेड,दि. 7 :- शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनधारकांनी आरटीओ
कार्यालयामार्फत वाहनाची तपासणी करुन घ्यावी. तपासणी न केलेल्या वाहनातून
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी राहणार नाही. याची वाहनधारक व पालकांनी
नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष तथा
पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे. समितीची बैठक श्री. मीना यांच्या
अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
शालेय मुलांची
वाहतुकीसाठी नोंद झालेली स्कूल बस वाहने हे स्कूल बस नियमावलीतील सुरक्षाविषयक तरतुदीचे
पालन करतात किंवा नाही याची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोफत तपासणी करण्यात
येणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या
वाहनाचा क्रमांक, वाहन धारकाचे नाव, त्यांचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक आदी
माहितीची नोंद ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
00000
No comments:
Post a Comment