केळी, हरभरा पीकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 10
:- केळीच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त
असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर होत असल्याने जास्तीतजास्त
पाने कार्यरत ठेवण्यासाठी फक्त पानाचा रोगग्रस्त भाग काढून बागेबाहेर नेऊन नष्ट
करावा. पानावरील लहान-लहान तपकिरी ठिपके वाढून एकत्र होतात. त्यामुळे मोठा ठिपका
होऊन पानाचा जास्त भाग रोगग्रस्त होतो. त्यासाठी झाडावर प्रोपिकोनेझॉल 0.05 टक्के
(0.5 मिली) मिनरल ऑईल 1 टक्के ( 10 मिली) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच हरभरा घाटेअळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट
5 एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी, फवारणी करावी. मर रोग नियंत्रणासाठी
कार्बेडेझीम 50 डब्ल्यु पी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, असे आवाहन
उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment