Saturday, November 18, 2017

अनोळखी महिलेच्या मृत्युबाबत
माहिती देण्याचे पोलीसाचे आवाहन  
नांदेड, दि. 18 :- एका अनोळखी महिलेचे प्रेत नांदेड तालुक्यातील वाजेगाव येथील जुन्या पुलाखाली गोदावरी नदीच्या पात्रात शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी सापडले आहे. या महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी माहिती दयावी, असे आवाहन नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
या अनोळखी महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे. वय अंदाजे 25 वर्षे असून अंगात हिरव्या रंगाची चॉकलेटी कलरची खडे असलेली साडी, पिवळ्या रंगाचे ब्लाऊज आहे. हातात बांगड्या असून बांधा मजबुत, चेहरा गोल, डोक्यास काळे केस, कपाळावर लाल रंगाची टिकली, पायात चैन व पायाच्या अंगठ्याजवळील बोटात जोडवे आहेत. या अनोळखी महिलेच्या नातेवाईकाचा शोध व ओळख पटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक के. बी. नेहरकर (9604690494, 02462-226373) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...