आधार सेवांसाठी अधीक शुल्क
आकारल्यास तक्रार करावी
- जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात
आधार नोंदणी केंद्रात 57 आधार संच सुरु झाले आहेत. संबंधीत केंद्रचालकाने विविध
आधार सेवांसाठी ठरलेल्या दरपत्रकापेक्षा अधीक शुल्क आकारल्यास त्वरित टोल फ्री क्र.
1947 वर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रार करावी, असे आवाहन
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.
विविध आधार सेवांसाठी
शुल्क पुढील प्रमाणे आहेत. आधार नोंदणीकरण व पाच आणि 15 वर्षे पुर्ण करणाऱ्या
मुलांचे बायोमेट्रीक अद्ययावतीकरण अनिवार्य हे नि:शुल्क आहे. इतर बायोमेट्रीक
अद्ययावतीकरण, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाईल क्रमांक व ई-मेल इत्यादीचे
अद्ययावतीकरण 25 रुपये, आधार क्रमांक शोधणे व त्याची ए 4 साईजची ब्लॅक अँड व्हाईट
प्रतसाठी 10 रुपये तर ए 4 साईजची रंगीत प्रत काढण्यासाठी 20 रुपये शुल्क निश्चित
करण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार निदर्शनास आल्यास त्वरित
टोल फ्री क्र. 1947 वर किंवा help@uidai.gov.in वर मेल पाठवा. अधिक माहितीसाठी uidai.gov.in
ला भेट द्या, असेही आवाहन करण्यात आले आहे.
00000000
No comments:
Post a Comment