Monday, June 12, 2017

जिल्हा रुग्णालयातील समुपदेशकाच्या
प्रसंगावधानाने अपघातग्रस्ताचे वाचले प्राण  
नांदेड, दि. 12 :-  छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर रविवारी 11 जुन रोजी रात्री 9.30 वा. दरम्यान  दुचाकीस्वार विजय राम वाघमारे, एकतानगर यांचा वाहन घसरुन अपघात झाला. या अपघातात प्रसंगावधान राखून जिल्हा रुग्णालय येथील समुपदेशक सदाशिव सुवर्णकार यांनी मदतीचा हात पुढे केला. यामुळे दुचाकीस्वाराचा प्राण वाचला.
छत्रपती चौक ते मोर चौक या रस्त्यावर दुचाकीस्वाराचा वाहन घसरुन अपघात झाल्याचे श्री सुवर्णकार यांच्या लक्षात येताच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता 108 या रुग्णवाहिकेमार्फत संबंधीत जखमी श्री. वाघमारे यांना जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यामुळे वाघमारे यांना प्रथपोचार तात्काळ मिळाल्याने त्यांचा प्राण वाचला. सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे. अपघाताच्या घटनेप्रसंगावधान राखून मदत करणाऱ्या सुवर्णकार जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांने कौतूक केले. जखमी वाघमारे यांच्या वरील उपचारासाठी रुग्णालयातील कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी, तसेच ईएमएस समन्वयक सचिन कोताकोंडावर यांनी सहकार्य केले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...