व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी
संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 11 :- सामाजिक
न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्थांना त्यांच्या कार्यासाठी
पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी अशा पात्र व इच्छुक संस्थांनी अर्ज गुरुवार 25
मे 2017 पर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने
केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी
व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पूनर्वसन केंद्र योजनेंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी
संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान या योजनेअंतर्गत संस्थांना त्यांचे व्यसनमुक्ती
क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन 12 संस्थांना ( प्रत्येक महसूल विभागातून दोन
संस्था प्रत्येकी ) 11 लाख प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी
पात्र संस्थांनी त्यांचे प्रस्ताव गुरुवार 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत
जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदे यांचेकडे सादर करावेत. विहित मुदतीनंतर
प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी सामाजिक
न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट दयावी.
00000
No comments:
Post a Comment